पावसामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली
By Admin | Updated: July 14, 2016 01:00 IST2016-07-14T00:32:28+5:302016-07-14T01:00:59+5:30
गजानन वानखडे , जालना जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. साडेसहाशे असलेली टँकर संख्या ९१ वर आली आहे. तीन तालुके टँकरमुक्त झाली आहेत

पावसामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली
गजानन वानखडे , जालना
जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. साडेसहाशे असलेली टँकर संख्या ९१ वर आली आहे. तीन तालुके टँकरमुक्त झाली आहेत. तर अंबड, बदनापूर, आणि घनसावंगी या तालुक्यांत विहिरींना पाणी आल्याने टँकर बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अल्पसा पाऊस झाला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात टँकरवर निधी उपलब्ध करण्यात आला होता. जिल्ह्यात जून महिन्यापर्यंत ६५० टँकर सुरू होते. जिल्ह्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने टँकरचा संख्या घटून ९१ आली असल्याने प्रशासनाचा पाण्यावर होणारा लाखो रूपयांचा खर्च सुध्दा वाचणार आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
अंबड, घनसावंगी आणि बदनापूर या तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गावातील नदी, नाले आणि शेतकऱ्यांच्या विहिरीसह गावाला पाणीपुरवठा करणारे प्रकल्पांमध्ये पाणी आल्याने टँकर बंद करण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाला कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. निव्वळ पाणी पुरवठ्यावर कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हा परिषदेकडून खर्च करण्यात येतो. परंतु जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पाण्याचे स्त्रोत आटल्याने सर्वच तालुक्यांत पाणी टंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्या लागत होत्या. परंतु पावसाने विलंबाने का होईना जोरदार सुरूवात केल्याने बहुतांश तालुक्यांतील प्रकल्पांत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. तर गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तुडुंब भरल्याचे चित्र असल्याने तालुक्यातील टँकर कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भोकरदन, जाफराबाद, या तालुक्यांत अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने दोन्ही तालुक्यांत ८६ टँकर सुरू आहेत.
भोकरदनमध्ये ६५ तर जाफराबाद मध्ये २१ टँकर सुरू असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास ते बंद होण्याची चिन्हे आहेत. जालना तालुक्यात ५ टँकर, परतूर येथे फक्त १ , मंठ्यात २ असे एकून ९१ टँकर सुरू असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र आंटद यांनी सांगितले.
जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. निव्वळ पाणी पुरवठयावर कोट्यवधी रूपये जिल्हा परिषदेकडून खर्च करण्यात येतात. परंतु जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पाण्याचे स्त्रोत आटल्याने सर्वच तालुक्यांत पाणी टंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्या लागत होत्या. परंतु पावसाने थोडे उशिराने का होईना जोरदार सुरूवात केल्याने प्रकल्पांत पाणीसाठा वाढत आहे.
जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अल्पसा पाऊस झाला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पावसामुळे टँकरच्या संख्येत मोठी घट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.