जि़प़ समोर कर्मचाºयांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:38 IST2017-09-15T00:38:19+5:302017-09-15T00:38:19+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाकडे एनआरएचएम व आरकेएस योजनेचे संपूर्ण लेखाविषयक कामकाज लादल्याचा निषेध करीत गुरुवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने एकदिवसीय धरणे आंदोलन केले़

जि़प़ समोर कर्मचाºयांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाकडे एनआरएचएम व आरकेएस योजनेचे संपूर्ण लेखाविषयक कामकाज लादल्याचा निषेध करीत गुरुवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने एकदिवसीय धरणे आंदोलन केले़
सकाळी ११ च्या सुमारास या आंदोलनास सुरुवात झाली़ या आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी, कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ एनआरएचएम व आरकेएस योजनेतील लेखाविषयक कामकाज आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाकडून काढून घेण्यात यावे, अशी मागणी केली़
सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी २ वाजता मागे घेण्यात आले़ यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, नानासाहेब राऊत यांनी भेट देवून जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कंत्राटी स्वरुपावर कर्मचारी नेमता येतात का यावर सभागृहात चर्चा करू व यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाºयांशी चर्चा करू, असे सांगितले़
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक डहाळे, एस़एस़ खाजा, ए़पी़ घटे, ए़ आऱ नितनवरे, ए़टी़ राऊत, एम़एम़ कांबळे, व्ही़एम़ सलोने, एस़ आऱ पितळे, बी़एस़ घुंबरे, सांगोले, डाके, शेख शकील, नरगुल्ला, चवळे, शाहीम बेगम, कदम, गायंगी आदी कर्मचारी उपस्थित होते़