बत्ती गूल झाल्याने मिनी मंत्रालयात अंधार
By Admin | Updated: May 8, 2017 23:43 IST2017-05-08T23:40:01+5:302017-05-08T23:43:15+5:30
जालना : शहरात सोमवारी दिवसभर दिवस वीज गूल झाल्याने विविध शासकीय कार्यालयात अंधार होता.

बत्ती गूल झाल्याने मिनी मंत्रालयात अंधार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात सोमवारी दिवसभर दिवस वीज गूल झाल्याने विविध शासकीय कार्यालयात अंधार होता. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जि.प.कडे जनरेटरची व्यवस्था नसल्याने जिल्हा परिषदेत दिवसभर अंधार होता. परिणामी कार्यालयातील कर्मचारी जि.प. कार्यालयात फेरफटका मारताना दिसून आले. काही कर्मचाऱ्यांनी घर जवळ केले होते.वीज नसल्याने संगणकावर होणारी सर्व कामे ठप्प होती.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरातील वातावरणात अचानक बदला झाल्याने उकाडा वाढला आहे. त्यातही महावितरणकडून गत दोन दिवसांपासून तातडीचे भारनियमन सुरू केले आहे.
नवीन उपकेंद्र थापटी तांडा येथून जोडणी करण्याचे काम महावितरणने हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरात दिवसभर वीज गूल होती. जिल्ह्याचे केंद्र असलेली जिल्हा परिषदेची सर्व कार्यालयात अंधार पसरला होता.
ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेली जिल्हा परिषद दिवसभर अंधारात असल्याने विविध कार्यालयातील कामे ठप्प होती. सध्या बहुतांश कामे संगणकामार्फेत करण्यात येत असल्याने वीजच नसल्याने कामे ठप्प होती. परिणामी ग्रामीण भागातून आलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली.एवढ्या मोठ्या जि.प.कडे जनरेटची व्यवस्था नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. जिल्हा परिषद कार्यालयात स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था करावी, अशी मागणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांतून केली जात आहे.