परवान्याअभावी जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्या होणार बंद
By Admin | Updated: July 1, 2014 01:05 IST2014-07-01T00:26:33+5:302014-07-01T01:05:02+5:30
उस्मानाबाद : स्वतंत्र खाणकाम आराखडा मंजूर करून न घेतलेल्या व पर्यावरणाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्या बंद करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी दिले आहेत.

परवान्याअभावी जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्या होणार बंद
उस्मानाबाद : सक्षम प्राधिकाऱ्यांकडून स्वतंत्र खाणकाम आराखडा मंजूर करून न घेतलेल्या व पर्यावरणाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्या बंद करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी दिले आहेत.
मुंबई येथे गौण खनिज दगड उत्खनन (खदान) च्या पर्यावरण नाहरकतीबाबत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील खदानीबाबत खाणकाम आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध अभिलेखानुसार जिल्ह्यात ८२ दगड खदाणी असून, त्यापैकी २४ परवानाधारक तर दोन मुदत संपलेल्या आहेत.
याशिवाय ५८ खदानधारकांनी परवाना देण्याबाबत मागणी केलेली असून, यासाठी राज्य पर्यावरण समितीचे नाहरकत प्रमाणपत्र व खाणकाम आराखडा मंजूर असणे आवश्यक होते.
संबंधित तहसीलदारांमार्फत खदानधारकांनी कळवूनही त्यांनी पर्यावरण आराखडा सादर केलेला नसल्याने महाराष्ट्र गौण खनिज उत्खन्न नियमानुसार परवानगीबाबत खदान मालक जोपर्यंत पर्यावरण नाहरकत व खाणकाम आराखडा सादर करत नाहीत तोपर्यंत त्या दगड खदानी बंद करण्याचे आदेश पाटील यांनी दिले.
या आहेत खाणपट्टया
उस्मानाबाद तालुक्यात उस्मानाबाद, येडशी, वाघोली, उपळा, पाडोळी, वडगाव, जहागीरदारवाडी, शिंगोली, सकनेवाडी, कुमाळवाडी, तुळजापूर : तुळजापूर, सिंदफळ, सावरगाव, तामलवाडी, वडगाव लाख, पिंपळा बुद्रुक, काक्रंबा, खंडाळा, रायखेल, अरबळी, टेलरनगर, नळदुर्ग, मोर्डा, बोरी, लोहाऱ्यात जेवळी (रुद्रवाडी), खेड, लोहारा खुर्द, उमरगा : उमरगा, कोरेगाववाडी, गुगळगाव, काळानिंबाळा, गुंजोटी, गुरुवाडी, कळंब : वडगाव (शि), हासेगाव (के), डिकसळ, उपळाई, रांजणी, वाशी तालुक्यातील मस्सा, पार्डी, इसरुप, भूम तालुक्यातील पाडोळी, हाडोंग्री, परंडा तालुक्यातील परंडा, जामगाव, आवारपिंपरी, काटेवाडी, रोसा, कुंभेजा, अनाळा आदी ठिकाणी खाणपट्ट्या आहेत. (प्रतिनिधी)
दंडात्मक कारवाई
जिल्ह्यात मागील महिन्यात पथकामार्फत खाणपट्ट्यांची तपासणी व मोजणी करण्यात आली होती. या पथकाचा तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी खाणपट्ट्या चालकांनी नियमनाचे उल्लंघन केल्याचे समजले आहे. पथकाचा अहवाल येताच ज्या खाणपट्ट्या चालकाने नियमनाचे उल्लंघन केले, अशावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.