निधीच नसल्याने अपंगांचे विविध प्रस्ताव रखडले..!
By Admin | Updated: December 3, 2015 00:30 IST2015-12-03T00:11:05+5:302015-12-03T00:30:40+5:30
जालना : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत अंपगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु निधीच्या कमतरतेमुळे अपंगांचे विविध प्रस्ताव धूळ खात पडून आहेत.

निधीच नसल्याने अपंगांचे विविध प्रस्ताव रखडले..!
जालना : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत अंपगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु निधीच्या कमतरतेमुळे अपंगांचे विविध प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. अपंगांना समाजकल्याण विभागात खेटे मारावे लागत आहेत.
समाज कल्याण विभागामर्फत अपंगांसाठी एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल योजना, एसटीत अर्ध्या तिकीटसाठी योजना, सामान्य व्यक्तीने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यास त्यांना ५० हजारांचे अनुदान, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून अपंग व्यक्तिंसाठी ३ टक्के विविध योजनेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सर्वच योजनां निधीअभावी थंडबस्त्यात आहेत. दोन वर्षांपासून काहींचे प्रस्ताव प्रंलबित आहेत.
बीज भांडवल योजनेसाठी २०१४ पासून २२३ प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे आले आहेत. त्यासाठी विभागाने शासनाकडे २५ लक्ष रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु शासनाकडून फक्त ८ लक्ष रूपये आल्याने त्यातील ८३ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आल्याचे समाज कल्याण अधिकारी संगीता मकरंद यांनी सांगितले. तर उर्वरित लाभार्थी निधीअभावी अनुदानापासून वंचित आहेत. तसा आम्ही प्रस्तावच शासनाला पाठविला असल्याचे मकरंद म्हणाल्या. सरकाने १ एफ्रिल २०१४ पासून राज्यात सामान्य नागरिकाने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यास त्यास ५० हजार रूपये अनुदान देण्यात येते. परंतु जिल्ह्यातून यासाठी २२ प्रस्ताव प्राप्त होऊनही निधीअभावी जोडप्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक जोडपे जिल्हा परिषदेत चकरा मारत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या १३ शाळा, विद्यालयात एकूण ५५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना इयत्ता पहिले ते दहाविच्या विद्यार्थ्यांना विभागाच्या मार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु शिष्यवृत्तीची रक्कमही शासनाकडून नियमीत येत नसल्याने त्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे सांगण्यात येते. शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रामेश्वर पांडुरंग भोसले, गणेश खिरे यांच्यासह अन्य लाभार्थींनी केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले कोणत्याही अपंग व्यक्तीला निर्सगाने अपंगत्व दिले तरी त्यांच्या मध्ये दुसरा सुप्त गुण त्असतो. म्हणून ते समाजाचे एक अविभाज्य घटक आहे. त्यांना कोणीही कमी लेखू नये. अपंग व्यक्ति आत्ता विविध क्षेत्रात आपला ठसा उमटमत आहेत. जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा देता. तसेच त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रमुख या नात्याने प्रयत्नशील आहे. अपंग व्यक्तिने छोट्या कामासाठी येथे यावे हे गंभीर बाब आहे. समाज कल्याण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवस तालुक्याच्या ठिकाणी कॅप घेवून अपंगांच्या अडीअडचणी सोडवाव्यात, यासाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचे चौधरी म्हणाले.