शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

‘सीआरएफ’ला अनुदान नसल्याने रस्त्यांच्या कामांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:21 IST

सेंट्रल रोड फंडच्या (सीआरएफ) कामांवर पैशांअभावी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : सेंट्रल रोड फंडच्या (सीआरएफ) कामांवर पैशांअभावी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने सीआरएफ थांबविल्यामुळे मराठवाड्यातील कामांची गोची झाली आहे. ती कामे बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. 

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी मराठवाड्यातील रस्त्यांच्या कामांबाबत घोषणा केली. त्यात एनएचएआय, सीआरएफअंतर्गतच्या कामांचा समावेश होता. १८ हजार कोटींच्या कामांच्या घोषणेतील किती कामे मराठवाड्यात तीन वर्षांत पूर्ण झाली, किती प्रगतिपथावर आहेत. एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआयकडे किती कामे वर्ग झाली, याची माहिती कुणीही देत नसल्यामुळे या कामांचे झाले तरी काय, हे समजण्यास मार्ग नाही.

दरम्यान आता सीआरएफअंतर्गत अनुदान येणे थांबल्यामुळे मराठवाड्यातील घोषित कामांना कधी मुहूर्त लागणार असा प्रश्न आहे. नागपूर वगळता विदर्भातील सर्व कामे थांबविण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे, तर मराठवाड्यातील रस्त्यांची उपयोगिता आणि प्राधान्यक्रम न ठरविल्यामुळे ती कामेदेखील ठप्प पडणार आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सीआरएफचा निधी उपलब्ध झाला नाही. हे खरे आहे. हायवेंचा निधी थांबविण्यात आलेला नाही. सीआरएफ थांबविले आहे. प्राधान्यक्रम न ठरविल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे.

१८ हजार कोटींचा भूलभुलय्या१८ हजार कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामांत भूलभुलय्या झाला आहे. औरंगाबाद ते फुलंब्रीमार्गे सिल्लोड ते पहूर ते जळगाव हा १५५ कि़मी.चा रस्ता १५५० कोटींतून तर औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते मुक्ताईनगर हा ४०१ कि़मी. रस्ता ४ हजार १० कोटींतून करण्याची घोषणा करण्यात आली होती. औरंगाबाद ते वैजापूर ते नाशिक १८३ कि़मी. रस्ता १८३० कोटींतून, तर औरंगाबाद ते वैजापूर ते कोपरगावमार्गे शिर्डी हा १५० कि़मी. रस्ता १५०० कोटी खर्चातून करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले होते. औरंगाबाद ते परभणी हा १२५० कोटींचा निधी १२५ कि़मी. रस्त्याचा आहे, तसेच खामगाव ते सांगोला हा मार्ग ४५० कि.मी. रस्ता ४५० कोटींतून करण्याचे सांगण्यात आले. वाटूर फाटा केंद्रस्थानी ठेवून या मार्गांचे काम करण्यात येणार होते. ही कामे कुठे आहेत, हे सक्षम यंत्रणेने जाहीरपणे सांगावे एवढीच अपेक्षा नागरिकांना आहे.  

टॅग्स :fundsनिधीState Governmentराज्य सरकारhighwayमहामार्ग