नजर आणेवारी वाढल्याने शेतकरी सापडले संकटात
By Admin | Updated: October 5, 2014 00:48 IST2014-10-05T00:40:55+5:302014-10-05T00:48:52+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर \खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़ त्यातच उघडीप दिलेल्या पावसामुळे आहे त्या पिकांची वाढही म्हणावी त्या प्रमाणात झालेली नाही़ वरवरच्या पाहणीव्दारे

नजर आणेवारी वाढल्याने शेतकरी सापडले संकटात
बाळासाहेब जाधव , लातूर
\खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़ त्यातच उघडीप दिलेल्या पावसामुळे आहे त्या पिकांची वाढही म्हणावी त्या प्रमाणात झालेली नाही़ वरवरच्या पाहणीव्दारे पिकांचे सर्वेक्षण करून महसूल विभागाच्या वतीने खरीप पिकांची नजर आणेवारी ६८ टक्के लावण्यात आल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे़ या वर्षी उशीरा झालेल्या पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या़जिल्ह्यात ५ लाख ६० हजार ८८२ एवढ्या क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली़यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर,मुग, उडीद, भुईमुग, कारळ, तीळ, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी झाली़ तसेच कापूस व ऊस या पिकांचीही लावण करण्यात आली़ उशीरा झालेल्या पावसामुळे खरीपांच्या इतर पिकांच्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ यामध्ये लातूर तालुक्यात ७ हजार ४३़२० हेक्टरवर, रेणापूर तालुक्यात ४५ हजार ७७ हेक्टर, औसा तालुक्यात ९८ हजार ९़०६८, निलंगा तालुक्यात ९२ हजार ७०२२, शिरूर अनंतपाळ तालुक्यात २५ हजार ४०८६, उदगीर तालुक्यातील ४९ हजार १२, देवणी ३२ हजार ९़२, जळकोट २२ हजार ७़०३, चाकूर ५७ हजार १२५, अहमदपूर ६२ हजार ५़६७, ५७ हजार १२५,अशा एकूण ५ लाख ६०हजार ८८२ हजार हेक्टरवर खरीपांची पेरणी झाली़ उशीरा झालेल्या पावसामुळे पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली नाही़ परिणामी खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ लातूर जिल्यातील काही तालुक्यातील खरिप पिकांची आणेवारी ६८ टक्के महसूल विभागाच्या वतीने दाखविल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे़ परंतु सदरील आणेवारी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केलेल्या पिक पाहणीनुसार दर्शविली आहे़ परंतु ही पिक पाहणी आणखी दोन टप्यात होणार असल्याने आणेवारी कमी जास्त होऊ शकते अशी माहीती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली़