पत्रे उडाल्याने पाणी शाळेत

By Admin | Updated: August 9, 2015 00:25 IST2015-08-08T23:55:14+5:302015-08-09T00:25:37+5:30

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील सुंदरवाडी कोळवाडी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, तेथे इयत्ता पहिली ते सहावीपर्यत वर्ग भरतात.

Due to flying letters, water is in the school | पत्रे उडाल्याने पाणी शाळेत

पत्रे उडाल्याने पाणी शाळेत


वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील सुंदरवाडी कोळवाडी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, तेथे इयत्ता पहिली ते सहावीपर्यत वर्ग भरतात. मात्र, काही दिवसांपूर्वी वर्ग खोलीवरील पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी या खोलीत गेल्याचा प्रकार घडला. या वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या शाळेत चारपैकी दोनच खोल्या सुस्थितीत आहेत. उर्वरित दोन खोल्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. शिक्षकांची संख्या चार असून पंच्याहत्तर विद्यार्थी आहे.
वालसावंगी ग्रामपंचायतचा सहा वार्डनंबर अंतर्गत सुदंरवाडी कोळवाडी गाव येते. या गावात संपूर्ण कोळी समाजाचे लोक राहतात. गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे.
येथे चार वर्ग खोल्यापैकी दोन वर्ग खोल्या सुमारे चाळीस पन्नास वर्षापासून मातीचे बांधकाम झालेले आहे. वांरवार मागणी करुनही देखभाल दुरुस्ती शिवाय अन्य कुठलेही अनुदान मिळाले नसल्याचे मुख्याध्यापक एस.डी. लोखंडे यांनी सांगितले. या वर्ग खोल्या पाऊस आला की गळायला लागतात व विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्याने व्हरांड्यातच शाळा भरवावी लागते. या दोन खोल्यावरील गेल्या काही महिन्यांपूर्वी पत्रे उडाली. तसा दुरुस्तीचा प्रस्तावही वरिष्ठाना दिला आहे. परंतु पुढे काहीच झाले नसल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
शाळेवरील पत्रे उडाल्याने दोन वर्ग बसवायचे कोठे असा प्रश्न आहे कारण पावसाच्या पाण्याने वर्गात गुडघ्यापर्यत पाणी राहते. तरी आम्ही व्हरांडयातच शाळा भरवत आहे. या दोन वर्ग खोल्या सुमारे चाळीस पन्नास वर्षाापूर्वीच्या असल्याने कच्या मातीत बांधकाम असून भित्ांंीही झुकल्या आहे.यामुळे विदयार्थाच्या अंगावर पडल्यास मोठा घोका होउ शकतो.तसा आम्ही वरीष्ठाना जुने बांधकामच्या दोन वर्ग खोल्या पाडुन नवीन वर्ग खोल्या बांधुन देण्यात यावे असा प्रस्ताव पाठविला आहे.
-एस.डी.लोखंडे, मुख्याध्यापक

Web Title: Due to flying letters, water is in the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.