सरपंचाविरुद्ध उपोषणास बसल्यामुळे एकास मारहाण

By Admin | Updated: July 31, 2014 01:23 IST2014-07-31T00:51:45+5:302014-07-31T01:23:24+5:30

आखाडा बाळापूर : सरपंचाच्या विरुद्ध उपोषणास का बसला? म्हणून एकास काठीने मारहाण करून हातास गंभीर दुखापत केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे २९ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

Due to a fierce resignation against Sarpanch, | सरपंचाविरुद्ध उपोषणास बसल्यामुळे एकास मारहाण

सरपंचाविरुद्ध उपोषणास बसल्यामुळे एकास मारहाण

आखाडा बाळापूर : सरपंचाच्या विरुद्ध उपोषणास का बसला? म्हणून एकास काठीने मारहाण करून हातास गंभीर दुखापत केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे २९ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. तब्बल एक महिन्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील राजू कमलाकर पाईकराव हा पत्नीसोबत नळावर पाण्याची घागर आणण्याकरीता गेला असता माधव चिमणाची पाईकराव, कैलास चिमणाजी पाईकराव, अशोक चिमणाची पाईकराव हे तिघेजण तेथे आले व ‘तू मागील भांडणाच्या कारणावरून तू सरपंचाच्या विरुद्ध उपोषणास का बसला? म्हणून माधव याने काठीने डाव्या हातावर मारहाण केली व तसेच मानेवर व खांद्यावर मारहाण केली. कैैलास याने राजूच्या पत्नीच्या कमरेवर काठी मारुन मुका मार दिला व गळा आवळून शिवीगाळ केली तर अशोक यांने पत्नीचे केस धरून ओढले. यावरून राजू पाईकराव यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव पाईकराव, कैैलास पाईकराव, अशोक पाईकराव या तिघांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ. हिदायत अली करीत आहेत.(वार्ताहर)
जळालेल्या महिलेचा मृत्यू
हट्टा : रॉकेलची चिमनी अंगावर पडून जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान २७ जुलै रोजी मृत्यू झाला. वझीराबाद पोलिस ठाण्याकडून उशिरा कागदपत्रे आल्याने बुधवारी हट्टा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.वसमत तालुक्यातील पिंपळगाव (कुटे) येथील मुक्ताबाई सुर्यभान कुटे (२०) हिने २७ जुलै रोजी रात्री लाईट गेल्याने चिमनी लावली. ही चिमनी विझवण्यासाठी गेली असता पाटीवरील चिमनी अंगावर पडल्याने मुक्ताबाई गंभीररित्या भाजली. उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले असता २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. कागदपत्रांअभावी बुधवारी हट्टा पोलिसात नोंद झाली. तपास सपोउपनि मौला पठाण, जमादार बी.एस. राठोड करीत आहेत.
आॅटो उलटल्याने एक ठार
वसमत/कौठा : वसमत-कौठा रस्त्यावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आॅटो उलटला. या अपघातात आॅटो चालक गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे. वसमतकडून किन्होळ्याकडे निघालेला आॅटो क्र.एम.एच. २६-२५६८ हा कौठा पाटीजवळ उलटला. या अपघातात आॅटोचालक संतोष विश्वनाथ पवार (३१) हा ठार झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

Web Title: Due to a fierce resignation against Sarpanch,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.