इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी

By Admin | Updated: June 28, 2014 01:14 IST2014-06-28T00:13:01+5:302014-06-28T01:14:49+5:30

बीड : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे.

Due to the fear of English crowds | इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी

इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी

बीड : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे. त्यातूनच खासगी शिकवण्यांनाही गर्दी वाढत असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून दिसून येते. मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असल्यानेच शिकवणी लावल्याचे अनेक पालकांनी म्हटले आहे. तसेच, ‘केजी’पासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जात असल्याचेही सर्वेक्षणात आढळून आले.
आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लागावी, किंबहुना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावे, यासाठी त्याला जास्तीत-जास्त पुरक शिक्षण दिले जाते. मग या पुरक शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जेतात. योग्य शाळा लावणे, घरी वेळच्या-वेळी अभ्यास घेणे, त्याचबरोबर पाल्यास योग्य शिकवणी लावणे याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे केजीपासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जाते.
मुले इंग्रजी माध्मयात शिकत असल्याने शिकवणी लावत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार केजी ते इयत्ता चौथीपर्यंत शिकवणी लावण्याचे हे प्रमाण ४० टक्के आहे. साधारणत: एवढेच म्हणजे ३५ टक्के आठवी ते दहावीतील मुले शिकवणीला जातात. इंग्रजी माध्यमामुळे शिकवणी लावली असल्याचे तब्बल ७२ टक्के पालकांनी सांगितले आहे.
बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांना शिकवणी लावणे गरजचे झाले आहे. पुढच्या वर्गात जाण्याबरोबरच त्यांचा अभ्यासही वाढत जातो. आठवी व नववी हा दहावीचा पाया मानला जातो म्हणून शिकवणीची गरज पडते. पण, ज्युनियर-सिनियर के .जी. पासूनच मुलांनाही शिकवणी लावण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
...तरीही असमाधानी
शिकवणी लावण्यामागे, आपल्या पाल्याची गुणवत्ता वाढावी हा प्राथमिक उद्देश असतो. परंतु, सर्वेक्षणादरम्यान असे दिसून आले, की शिकवणी लावूनही मुलांच्या गुणवत्तेत समाधानकारक वाढ झालेली नाही. तब्बल ५८ टक्के मुलांना शिकवणी लावूनसुद्धा मुलांच्या गुणवत्तेत काही प्रमाणात वाढ झाली आहे, तर ४ टक्के पालकांनी शिकवणी लावूनही मुलांमध्ये काही बदल झाला नसल्याचे सांगितले.

Web Title: Due to the fear of English crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.