विजेची तार तुटल्याने तासभर वाहतूक ठप्प
By Admin | Updated: February 8, 2017 00:26 IST2017-02-08T00:23:07+5:302017-02-08T00:26:46+5:30
चंदनझिरा : औरंगाबाद जालना मार्गावर असलेल्या नागेवाडी टोलनाक्याजवळ अचानक उच्च दाबाची विजेची तार तुटल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

विजेची तार तुटल्याने तासभर वाहतूक ठप्प
चंदनझिरा : औरंगाबाद जालना मार्गावर असलेल्या नागेवाडी टोलनाक्याजवळ अचानक उच्च दाबाची विजेची तार तुटल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावर वाहनाच्या रांगाच रांगा लागून वाहतूक ठप्प झाल्याची घटना मंगळवारी आठवाजेच्या सुमारास घडली.
तार तुटल्याचे लक्षात येताच नागरिकांनी अपघात होऊ नये म्हणून तात्काळ या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून याची माहिती चंदनझिरा पोलीस आणि महावितरण कर्मचाऱ्यांना तत्काळ देण्यात आली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून वीजपुरवठा बंद करून तारेला रस्त्याच्या बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
विवाहितेचा छळ
जालना : विहीर बांधण्यासाठी माहेरवरून ५० हजार रूपये घेऊन ये या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद समिना शेख मुक्तार हिने मंगळवारी पारध पोलीस ठाण्यात दिली. शेख मुक्तार शेख रशिद, शेख रशिद शेख अहमद, शेख रफिक शेख रशीद, आणि एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.