जिल्हा रूग्णालयात एक्स्प्रेस फिडरनंतरही यंत्रणांत होतोय बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 00:24 IST2017-06-24T00:22:17+5:302017-06-24T00:24:32+5:30
जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात डायलिसस युनिटसह अन्य यंत्रणांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

जिल्हा रूग्णालयात एक्स्प्रेस फिडरनंतरही यंत्रणांत होतोय बिघाड
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात तातडीची वीज सेवा म्हणून एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित करण्यात आले आहे. असे असतानाही डायलिसस युनिटसह अन्य यंत्रणांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
जिल्हा रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन वगळता अन्य अत्याधुनिक मशिन उपलब्ध आहेत. मात्र, गत काही दिवसांपासून यंत्रणांमध्ये विजेच्या कमीअधिक दाबाचा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी डायलिसीस विभागातील चार युनिटमध्ये बंद पडले. त्यानंतर रूग्णालय प्रशासनाने दुरूस्ती करून ते सुरळीत केले. मात्र एक्स्प्रेस फिडर असताना विजेचा अधिकचा दाब निर्माण झाल्याने काही दिवस ही यंत्रणा बंद होती. याचा त्रास रूग्णांना सहन करावा लागला. डायलिसीस विभागात चार युनिट आहेत. महिन्याकाठी १०० ते १२५ रूग्णांवर येथे उपचार केले जातात. त्यामुळे यंत्रणा कायम सुरू असणे गरजेचे असतानाही बिघाड होतो. जिल्हाशल्य चिकित्सक सरिता पाटील म्हणाल्या की, केबलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करून युनीट पूर्ववत करण्यात आले आहे.