‘तंटामुक्ती’वर निवडणूक आचारसंहितेचे सावट
By Admin | Updated: September 12, 2014 00:04 IST2014-09-11T23:58:37+5:302014-09-12T00:04:45+5:30
बालासाहेब काळे, हिंगोली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत.

‘तंटामुक्ती’वर निवडणूक आचारसंहितेचे सावट
बालासाहेब काळे, हिंगोली
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. २०१२-१३ या वर्षामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शासनाकडे १५४ तंटामुक्त गावांची यादी पाठविण्यात आली होती. मात्र अजूनही ही गावे तंटामुक्त घोषित केल्याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही.
२०१२-१३ या वर्षात वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलीस ठाणे हद्दीतील कुरूंदवाडी, सेलू/ वर्ताळा, वाई गोरखनाथ, सिरळी, चोंढी बहिरोबा, लोहरा खु., काठोडा, धामणगाव, पार्डी बु., पांगरा बु., पुयणी बु., दरेगाव, आसोला, लोहरा बु., लोळेश्वर, हिरडगाव, खांबाळा, सुकळी, वाघी, पांगरा शिंदे, सिंगी, सेंदूरसना ही गावे जिल्हा बाह्य मुल्यमापन समितीने तंटामुक्त घोषीत केली होती.
याच प्रमाणे हट्टा ठाणे हद्दीतील तुळजापूर वाडी, जोडपरळी, चोंढी शहापूर, सुकापूर वाडी, नहाद, ढऊळगाव, ब्र्राम्हणगाव खुर्द, ब्राम्हणगाव बु., वडद, टेंभुर्णी, आरळ, आजरसोंडा, कोंडसी, जोडजवळा, पोटा खु., हट्टा, कुडाळा, अंजनवाडी, रेऊळगाव, लिंगी, जवळा बाजार ही गावे निवडण्यात आली. कळमनुरी ठाणे हद्दीतील उमरा (हातमाली-शिवणी बु.), सेलसुरा, सोडेगाव, जांभरून, भुतनर सावंगी, जामगव्हाण, खेड, सालेगाव, पिंपळदरी देववाडी, जलालदाभा, सोनवाडी, काकडदाभा, वसई ही गावे तसचे आखाडा बाळापूर ठाणे हद्दीतील कोंढूर, कुपटी, कसबे धावंडा, बेलथर, साळवा, दांडेगाव, कामठा, येहळेगाव तु., डोंगरगाव पुल, येगाव, देवजना, काळ्याची वाडी, डोंगरकडा, औंढा नागनाथ ठाणे हद्दीतील दुरचूना, लिंगपिंपरी, जामदया, गोंडाळा, गणेशपूर, चिमेगाव, गोळेगाव, गांगलवाडी, बेरुळा, उखळी, केळी, सावळी पार्डी, सिद्धेश्वर, येळी या गावांची निवड करण्यात आली. या शिवाय नर्सी नामदेव ठाणे हद्दीतील ब्रम्हपूरी व नर्सी, बासंबा ठाणे हद्दीतील पेडगाव, जोडतळा, अंभेरी, पिंपरखेड, देवाळा, ढोलउमरी, पिंपळदरी, पातोंडा, बोरी शिकारी, लिंबी, भिरडा, खेर्डा, लोहरा, तिखाडी, खरवड, दुर्गधामणी, मेथा, हिवरा बेल, राजूरा, कनका, कळमकोंडा या गावांची तंटामुक्त ग्राम बक्षिसासाठी निवड झाली होती. हिंगोली जिल्ह्यातील १५४ गावांची यादी पोलीस व जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविली आहे. त्यानुसार शासनाने ग्याझेट प्रसिद्ध करून सदरील गावे तंटामुक्त झाल्याचे घोषीत करणे अपेक्षित होते.
मात्र एक वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यंदा २० गावांची निवड झाली असली तरी लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही मोहीत अडचणीत आली असून तंटामुक्त गावांची घोषणा अधांतरी राहिली आहे.