यंदाच्या वेळा अमावस्येवर दुष्काळाचे सावट !

By Admin | Updated: December 21, 2014 00:09 IST2014-12-21T00:02:09+5:302014-12-21T00:09:35+5:30

औसा : मार्गशीर्ष महिन्यानंतर येणारी दर्श अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते़ या दिवशी शेत- शिवारं गजबजलेली असतात़

Due to the drought on this new moon day! | यंदाच्या वेळा अमावस्येवर दुष्काळाचे सावट !

यंदाच्या वेळा अमावस्येवर दुष्काळाचे सावट !


औसा : मार्गशीर्ष महिन्यानंतर येणारी दर्श अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते़ या दिवशी शेत- शिवारं गजबजलेली असतात़ सकाळपासूनच शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह शेतावर जाण्यासाठी लगबग करीत असतो़ या आनंदाच्या सणात पाहुणे मंडळी, मित्र सहभागी होतात़ परंतु, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शिवार ही उघडी-बोडकी पडली आहेत़ अशा बोडक्या शिवाराची पूजा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़
वेळा अमावस्येचा सण हा रविवारी आहे़ या सणादिवशी शेतकरी आपल्या शेतात पांडवाची पूजा करतो़ त्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे उंडे, सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भज्जी, खीर, अंबील, भात यासह अन्य खाद्य पदार्थ बनवले जातात़ सकाळी लवकर शेतकरी कुटुुंबासह शेतावर या पांडवांची पूजा करतो़ त्यास नैैवेद्य दाखविला जातो आणि मग सुरु होतात शेता-शेतात जेवणावळी़ यामुळे शिवार माणसांनी फुलून जातो़ तर गावात अघोषित संचारबंदी लागू केल्याची परिस्थिती असते़ दिवसभर शेतात जेवणावळी उरकल्यानंतर सायंकाळी शेतकरी आपल्या शेतात टेंभा मिरवतो़ यामागे आपल्या शेतातील रोगराई दूर व्हावी ही अपेक्षा असते़
यावर्षी मात्र दुष्काळाच्या झळामध्ये सर्वच होरपळून निघाले आहे़ यावर्षी शेतामध्ये खरीपातील काही पिके नाहीत ना रबी़ दरवर्षी शेतामध्ये तूर, ज्वारी, हरभरा, गहू ही पिके मोठ्या प्रमाणावर असतात़ या पिकांमुळे शेत शिवार हिरवीगार असतात़ शेतकरी मोठ्या उत्साहान शिवार पूजा करतो़ पण यावर्षी तालुक्यातील अनेक भागात शेतात पिके नाहीत, पाणी नाही़ त्यामुळे यावेळीची वेळा अमावस्या दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघतेय़्४
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव आदी मोठे प्रकल्प असल्याने शिरूर अनंतपाळची सिंचनाचा तालुका म्हणून ओळख आहे़ पण, यंदा केवळ ३५० मि़मी़ इतका पाऊस झाल्याने सरासरीही ओलांडली नाही़ त्यामुळे खरीप हातचे गेले तर हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येत आहे़ पावसाअभावी रबीचे साडेअकरा हजार हेक्टर क्षेत्र कोरडेच राहिले आहे़ त्यामुळे रबीतील गहू, हरभरा, जोंधळा, करडई, सूर्यफूल अशी पिके कोठेही दिसून येत नाहीत़
वेळा अमावस्येला शेतातील हिरव्यागार पिकांची पूजा केली जाते़ आकर्षक कोप उभारून कोपीची सजावटसुद्धा केली जाते़ परंतु, यावर्षी वेळा अमावस्येपूर्वीच उन्हाळयासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेत शिवार ओसाड पडली आहेत़ माळराने करड झाली आहेत़ त्यामुळे वेळा अमावस्येवर दुष्काळी सावट दिसून येत आहे़ तसेच हा सण दिवसभर शेतावर जाऊन साजरा करायचा असतो़ यासाठी शहरवासीयही गावाकडे येतात़ शेतात जाऊन भज्जी, रोडगा, अंबिल, खिचडा याचा आनंद घेतात़ परंतु, शिवारात पाणीच नसल्याने घरातून पाणी घेऊन जावे लागणार आहे़

Web Title: Due to the drought on this new moon day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.