नागपंचमीवर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 1, 2014 00:24 IST2014-07-31T23:37:40+5:302014-08-01T00:24:30+5:30
मो़या़शेख, वस्सा दरवर्षी श्रावण महिन्यात शेती हिरवीगार दिसते. परंतु यंदा पावसाअभावी खरीपाची पेरणी वाया गेली आहे,
नागपंचमीवर दुष्काळाचे सावट
मो़या़शेख, वस्सा
दरवर्षी श्रावण महिन्यात शेती हिरवीगार दिसते. परंतु यंदा पावसाअभावी खरीपाची पेरणी वाया गेली आहे, तसेच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या छळा बसत आहेत़ दुष्काळाच्या सावटातच नागपंचमी सणाच्या झोक्यावर उदासिनतेची छाया पसरली आहे. हा सण साजरा करण्याचे आवसान बळीराजात उरलेले नाही.
जिल्ह्यात पावसाचे जून व जुलै हे दोन महिने कोरडे ठाक गेले आहेत. मोठा पाऊस कुठेच झालेला नाही. हलक्या पावसावरच शेतकऱ्यांनी कशीबशी खरीपाची पेरणी पूर्ण केली खरी परंतु, ही पिके धोक्यात आली आहेत. १ आॅगस्ट रोजी नागपंचमी हा सण शहर व ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी सणासाठी सासरी गेलेल्या नवविवाहित मुलींना माहेरी आणण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे; परंतु शेतकऱ्यांनी अल्पश: पावसावर धूळ पेरणी केली होती. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके हातची गेली. त्यानंतर उसनवारी व कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तिही वाया गेली. अशा परिस्थितीत नागपंचमीचा सण कसा साजरा करावा या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. पंचमीचा झोका पावसाने ओलाचिंब व्हावा, अशी प्रतीक्षा लागली आहे़
गतवर्षी शेती होती हिरवीगार
गेल्या वर्षी जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती हिरवीगार होती. त्यामुळे जिल्ह्यातील नवविवाहित मुलींना नागपंचमी सणानिमित्त माहेरी आणले होते़ यंदा मात्र बळीराजा चारही बाजुंनी अडचणीत सापडला आहे़ त्यामुळे यंदा नागपंचमीचा सण साजरा करणाऱ्यावर दुष्काळाचे विरजन पडले आहे़
नागपंचमी म्हटले की नवविवाहित मुलीच्या आनंदाला पारावारच उरत नाही़ परंतु, यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे़
यामुळे नागपंचमीच्या दिवशी नवविवाहित मुलीचे वडील अथवा भाऊ तिला माहेरी आणण्यासाठी जातात़ परंतु, यंदा अशी परिस्थिती दिसून येत नाही़
ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यामुळे विद्यार्थ्यांनीही सण साजरा करण्यासाठी गावाकडे जाणे टाळले आहे़