दुरवस्थेमुळे अंगणवाडी उघड्यावर
By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-14T00:24:54+5:302014-07-14T01:00:47+5:30
संजय फुलारी , लामजना औसा तालुक्यातील लामजना येथील अंगणवाडीच्या इमारतीचे गारपिटीमध्ये नुकसान झाले़ अद्यापही या इमारतीची दुरूस्ती न केल्यामुळे बालकांना उघड्यावर बसावे लागत आहे़

दुरवस्थेमुळे अंगणवाडी उघड्यावर
संजय फुलारी , लामजना
औसा तालुक्यातील लामजना येथील अंगणवाडीच्या इमारतीचे गारपिटीमध्ये नुकसान झाले़ अद्यापही या इमारतीची दुरूस्ती न केल्यामुळे बालकांना उघड्यावर बसावे लागत आहे़
शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून लामजना येथे अंगणवाडीची इमारत बांधण्यात आली़ मार्चमध्ये झालेल्या गारपीटीमुळे अंगणवाडी क्रं़७ वरील पत्रे उडाली़ तसेच इमारतीचे मोठे नुकसान झाले़ परंतु, त्याकडे अद्यापही जिल्हा परिषदेचे लक्ष नाही़ परिणामी बालकांवर उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे़ त्यामुळे अंगणवाडीच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशा मागणीचे निवेदन अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या वतीने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले़ या अंगणवाडीत एकूण ३५ लाभार्थी शिक्षण घेत आहेत़ परंतू पावसाळ्यात या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे़ पावसाळा सुरू झाल्याने लामजनातील आठ अंगणवाड्यापैकी एका अंगणवाडीची दुरूस्ती झाली आहे़ तर अन्य अंगणवाड्यांनी गळती लागली आहे़ आजु बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन अंगणवाडीची दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे़
याबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिका एस़एम़ गुरव म्हणाल्या, सध्या अंगणवाडीकडे पैसे शिल्लक नाहीत़ त्यामुळे नाईलाजास्तव अंगणवाडी बाहेर भरली जात आहे़ पावसामुळे बालकांना त्रास होत आहे़ याबाबत आम्ही जिल्हा परिषद सदस्या सुलोचना बिदादा यांच्याकडे विषय मांडला असून जिल्हा परिषदेकडून निधी येताच दुरूस्तीचे काम सुरू केले जाईल असे त्यांनी सांगीतले़