महागाडी उपचार पद्धती गरीबांपर्यंत पोहोचविली
By Admin | Updated: July 20, 2015 00:53 IST2015-07-20T00:32:04+5:302015-07-20T00:53:20+5:30
लातूर : समाधान व हस्यांचे मूल्य कधीच करता येत नाही़ रुग्णांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आज असलेले हसू केवळ डॉ़ विठ्ठल लहाने यांच्यामुळे आहे़ प्लास्टीक सर्जरी उपचार

महागाडी उपचार पद्धती गरीबांपर्यंत पोहोचविली
लातूर : समाधान व हस्यांचे मूल्य कधीच करता येत नाही़ रुग्णांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आज असलेले हसू केवळ डॉ़ विठ्ठल लहाने यांच्यामुळे आहे़ प्लास्टीक सर्जरी उपचार पध्दती केवळ श्रीमंताची उपचार पध्दती होती़ ती मुंबईसारख्या शहरातच उपलब्ध होती़ लातूर सारख्या ग्रामीण भागात ही उपचार पद्धती गरिबांपर्यंत पोहोचविली़ व्यंग घेवून जीवन जगणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले, असे मत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी येथे व्यक्त केले़
६ हजार १५० मोफत प्लास्टीक सर्जरीच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्य दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात रविवारी उद्घाटक म्हणून ते बोलत होते़ मंचावर स्माईल ट्रेनचे कार्यक्रम प्रमुख सतीश कालरा, पुंडलिकराव लहाने, अंजनाबाई लहाने, पद्मश्री डॉ़ तात्याराव लहाने, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, डॉ़ कल्पना लहाने, डॉ़ वर्धमान उदगीरकर, डॉ़ संदीपान साबदे, डॉ़राजेश शहा यांची उपस्थिती होती़
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, डॉ़ लहाने यांच्यामुळे असंख्य रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे़ त्यांचे हे कार्य अनमोल आहे़ व्यंग घेवून जन्माला आलेल्या मुला-मुलींसह पालक चिंतीत असतात़ ही चिंता डॉ़ लहाने यांच्यामुळे संपली असल्याचे ते म्हणाले़ डॉ़ तात्याराव लहाने व डॉ़ विठ्ठल लहाने यांनी सामाजिक बांधिलकीतून रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, समाजापुढे एक आदर्श लहाने बंधुंनी ठेवला आहे़ डॉ़ विठ्ठल लहाने व डॉ़ तात्याराव लहाने यांच्या रुपाने हा आदर्श समाजापुढे उभा आहे़ आई-वडिलांच्या संस्कारामुळे त्यांच्या हातून सामाजिक बांधिलकीचे कार्य घडत आहे़ व्यंग घेऊन जन्माला आलेल्या बालकांचे चेहरे लहाने यांनी सुंदर केले आहेत़ यापुढेही ते सुंदर होतील़ सुंदर चेहऱ्याबरोबर संस्काराचा विसर कुणीही पडू देवू नये, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. चव्हाण म्हणाले़ ं
कार्यक्रमाचा समारोपात स्माईल ट्रेनचे कार्यक्रमाधिकारी सतीश कालरा म्हणाले, मुंबईत प्रथम डॉ़बमन डावर यांच्याशी भेट झाली़ तेव्हा त्यांनी लातूरला जाण्याची सूचना केली़ लातूरची ओळख भूकंपामुळे होती़ डॉ़विठ्ठल लहानेंना भेटल्यामुळे ते एक चांगले डॉक्टरच नाहीत तर ते चांगले माणूस आहेत, असे त्यांचे गुरू डॉ़ बमन डावर यांना मी सांगितले़ प्रास्ताविक डॉ़विठ्ठल लहाने यांनी तर आभार पद्मश्री डॉ़ तात्याराव लहाने यांनी आभार केले़