कंटेनर अडकल्याने सालपे घाटात कोंडी

By Admin | Updated: September 21, 2014 00:22 IST2014-09-21T00:22:15+5:302014-09-21T00:22:15+5:30

पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद-पुणे राज्य मार्गावरील सालपे घाटातील एका वळणावर सोळा चाकी कंटेनर अडकला.

Due to the container collapses, the dump in Salpay | कंटेनर अडकल्याने सालपे घाटात कोंडी

कंटेनर अडकल्याने सालपे घाटात कोंडी

पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद-पुणे राज्य मार्गावरील सालपे घाटातील एका वळणावर सोळा चाकी कंटेनर अडकला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती.
सालपे घाटात साताराकडून जाताना अर्ध्यापर्यंत रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात नेहमीच घडत असतात. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोणंदकडून आलेला (एचआर ५५ एल ३२६५) हा नंबर असलेला सोळा चाकी कंटेनर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने अडकला. तो नाल्याकडे गेला असता पाठीमागून दुसरा ट्रक आला. तो त्या कंटेनरला डाव्या बाजूने ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्न करत असताना त्या कंटेनरच्या मागील बाजूस घासला व अडकला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. वाठारचे पोलीस दोन तासांनंतर आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली. (वार्ताहर)

Web Title: Due to the container collapses, the dump in Salpay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.