नित्रूड, साक्षाळपिंप्रीत पूल खचल्याने भीती
By Admin | Updated: September 26, 2016 00:14 IST2016-09-25T23:41:11+5:302016-09-26T00:14:54+5:30
नित्रूड / साक्षाळपिंप्री : माजलगाव तालुक्यातील नित्रूड व बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील पूल खचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नित्रूड, साक्षाळपिंप्रीत पूल खचल्याने भीती
नित्रूड / साक्षाळपिंप्री : माजलगाव तालुक्यातील नित्रूड व बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील पूल खचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नित्रूड येथील तलाव भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. १३ तांड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल खचला आहे. जीव मुठीत धरून ये-जा सुरू आहे. दुरूस्तीची मागणी रविवारी सरपंच पोपट गायकवाड, अशोक डाके, शेख खलील, सुभाष डाके, अजय तिडके यांनी केली. बीड - साक्षाळपिंप्री रस्त्यावरील अर्धा पूल तुटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
जातेगाव - रोहितळ (ता. गेवराई) या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. बससेवा बंद असून, लहू गायकवाड, दत्ता गायकवाड, शेख शाकेर, संभाजी पवार यांनी दुरूस्तीची मागणी केली. (वार्ताहर)