पोलीस अधीक्षकांच्या बदलीवरून भाजपात गटबाजी
By Admin | Updated: May 13, 2016 00:15 IST2016-05-13T00:14:05+5:302016-05-13T00:15:14+5:30
औरगाबाद : ग्रामीण पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची नागपूरला झालेली बदली रोखण्यावरून भाजपमध्ये अंतर्गत गदारोळ सुरू झाल्याची चर्चा आहे.

पोलीस अधीक्षकांच्या बदलीवरून भाजपात गटबाजी
औरगाबाद : ग्रामीण पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची नागपूरला झालेली बदली रोखण्यावरून भाजपमध्ये अंतर्गत गदारोळ सुरू झाल्याची चर्चा आहे. आ. अतुल सावे आणि भारतीय जनता कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांच्यात त्या बदलीवरून चांगलीच जुंपणार असल्याचे संकेत आहेत.
केणेकर यांनी रेड्डी यांच्या बदलीला कडाडून विरोध करीत मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग केल्याने ही बदली रद्द झाली आहे. रात्री उशिरा पोलीस महासंचालकांच्या वेबसाईटवर बदल्यांची नवीन यादी अपडेट झाली. त्यामध्ये रेड्डी यांचे नाव सुधारित यादीमध्ये नव्हते.
भाजपमध्ये बदल्यांवरूनदेखील मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाल्याची ही नांदी आहे. आ. सावे आणि केणेकर यांच्यात पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यापासून प्रचंड वाद आहेत. ते वाद आजपर्यंत कायम आहेत. मनपा निवडणुकीत उमेदवार देताना देखील केणेकर यांच्या गटातील काही जणांना डावलण्यात आल्यामुळे हा वाद आणखी विकोपाला गेला आहे.
११ मे रोजी शासनाने पोलीस खात्यातील ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. १२ मे रोजी बदल्यांचा सुधारित आदेश जारी झाला. त्यामध्ये ३३ अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोन नावे वगळण्यात आली आहेत.
भाजपातील सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार रेड्डी यांची बदली रद्द करण्यासाठी केणेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ताकद लावली, तर आ. सावे यांनी रेड्डी यांची बदली करण्यासाठी प्रयत्न केले होते. सावे यांच्याही प्रयत्नाला यश आले आणि केणेकर यांच्याही प्रयत्नाला यश आल्यामुळे वरचढ कोण आहे. यावरून जोरदार चर्चा रंगत आहेत.