कृषी विभागाच्या कारभारामुळे जलयुक्तचा बोजवारा
By Admin | Updated: March 22, 2017 00:39 IST2017-03-22T00:37:44+5:302017-03-22T00:39:25+5:30
अंबड : तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत लाखो रुपये खर्चून जलयुक्त शिवार योजनेतंर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी किती वाढली हा संशोधनाचा विषय आहे.

कृषी विभागाच्या कारभारामुळे जलयुक्तचा बोजवारा
अंबड : जलयुक्त शिवार योजनेचा मुख्य उद्देश शिवारातील पडलेले पावसाचे पाणी अडवून शेत जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ करणे आहे. अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत लाखो रुपये खर्चून जलयुक्त शिवार योजनेतंर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे त्या-त्या गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी किती वाढली हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे.
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालया मार्फत १९ गावांमध्ये १ कोटी ७९ लाख ९९ हजार ६१० रुपयांची एकूण ७२ कामे करण्यात आली. विशेष आश्चर्यचकीत करणारा योगायोग म्हणजे यापैकी एकाही कामाने ३ लाख रुपये खर्चाची मर्यादा ओलांडली नाही.तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या एकाही कामाने ३ लाख रुपये खर्चाची मर्यादा न ओलांडल्याने इर्- निविदेच्या किचकट प्रक्रियेपासून सर्वांची आपोआपच सुटका झाली.
तालुका कृषी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार योजनेतंर्गत तालुक्यातील सारंगपुर येथे १८ लाख ४४ हजार ०३४ रुपये खर्चाचे ८ कामे, सौंदलगाव येथे १२ लाख ८४ हजार १५७ रुपये खर्चाचे ५ कामे, दोदडगांव येथे ३ लाख ८९ हजार १९८ हजार रुपये खर्चाचे २ कामे, लखमापुरी येथे १४ लाख ६ हजार २३१ रुपये खर्चाचे ५ कामे, जामखेड येथे १५ लाख ३७ हजार ८२८ रुपये खर्चाचे ६ कामे, पिंपरखेड येथे ४ लाख ९० हजार ७०६ रुपये खर्चाचे २ कामे, आंतरवाला आवा येथे ४ लाख ८ हजार ९२७ रुपये खर्चाचे २ कामे, रोहिलागड येथे ११ लाख ६१ हजार ६०९ रुपये खर्चाचे ५ कामे, कुक्कडगाव येथे ४७ लाख १८ हजार ९५ रुपये खर्चाचे ८ कामे, धाकलगाव येथे ९ लाख ५ हजार ७९० रुपये खर्चाचे ४ कामे, लेंभेवाडी येथे ५ लाख ६४ हजार ८२३ रुपये खर्चाचे २ कामे, भोकरवाडी येथे ५ लाख ६८ हजार १३ रुपये खर्चाचे २ कामे, भालगांव येथे २ लाख ४९ हजार ८८० रुपये खर्चाचे १ काम, पारनेर येथे १३ लाख ४६ हजार १२७ रुपये खर्चाचे ५ कामे, दहीपुरी येथे १० लाख ७७ हजार ३३० रुपये खर्चाचे ५ कामे, बनगांव येथे ७ लाख ६५ हजार ९२१ रुपये खर्चाचे ३ कामे, दहीगव्हाण येथे ५ लाख १९ हजार ४०० रुपये खर्चाचे २ कामे, निहालसिंगवाडी येथे ८ लाख २० हजार २०० रूपये खर्चाचे ३ कामे, भाटखेडा येथे ४ लाख ५ हजार ४४३ रुपये खर्चाचे २ कामे अशा प्रकारे १९ गावांमध्ये १ कोटी ७९ लाख ९९ हजार ६१० रुपये खर्चाचे एकुण ७२ कामे करण्यात आली आहेत.