ड्रायपोर्ट जिल्ह्यासाठी लाभदायकच..!

By Admin | Updated: January 5, 2016 00:05 IST2016-01-04T23:11:44+5:302016-01-05T00:05:08+5:30

गजेंद्र देशमुख , जालना उद्योग नगरी असलेल्या जालना शहराच्या चौफेर विकासात महत्वाचा ठरणाऱ्यामेगाप्रोजेक्टचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत नुकताच झाला.

Dryport is beneficial for the district ..! | ड्रायपोर्ट जिल्ह्यासाठी लाभदायकच..!

ड्रायपोर्ट जिल्ह्यासाठी लाभदायकच..!


गजेंद्र देशमुख , जालना
उद्योग नगरी असलेल्या जालना शहराच्या चौफेर विकासात महत्वाचा ठरणाऱ्यामेगाप्रोजेक्टचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत नुकताच झाला. जालना येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगांसोबतच जिल्ह्यात उत्पादित होणारा शेतमाल निर्यात होण्यास मदती व्हावी या उद्देशाने हा ड्रायपोर्ट उभारण्यात आला. ड्रायपोर्टबाबत लोकमतने प्रश्नावली माध्यमातून सर्वेखण केले. यात नागरिकांनी जिल्ह्याचा ६० टक्के विकास होईल असे मत नोंदविले. विविध प्रश्नांतून नागरिकांनी हा प्रकल्प जिल्ह्यासाठी लाभदायक असल्याचे मत नोंदविले.
लोकमतने ड्रायपोर्टबाबत सर्वेक्षण केले. यात चार प्रश्न विचारण्यात आली. यातून नागरिकांनी आपले मत नोंदविले.
ड्रायपोर्टमुळे मागासलेल्या जिल्ह्याचा खरोखरच विकास होईल का या प्रश्नावर ६० वाचकांना होय असे वाटते १५ वाचकांना काही प्रमाणात होईल असे वाटते २० टक्के वाचकांना माहीत नाही तर ५ टक्के वाचक अजिबात होणार नाही असे सांगतात. ड्रायपोर्टमुळे शेतीमाल निर्यातीस कितपत फायदा होईल या प्रश्नावर २० टक्के वाचकांना होय असे वाटते, ५० टक्के काही प्रमाणात तर २० टक्के वाचकांनी माहीत नसल्याचे सांगितले तर १० टक्के नागरिकांना अजिबात फायदा होणार नाही असे वाटते. ड्रायपोर्टमुळे रोजगार निर्मितीमुळे चालना मिळेला का? या प्रश्नावर ४० टक्के वाचक होय असे उत्तर देतात. ३० टक्के वाचकांना काही प्रमाणात फायदा होईल असे वाटते. २५ टक्के नागरिकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगतात. ५ टक्के वाचक म्हणतात अजिबात फायदा होणार नाही. ड्रायपोर्टमुळे उद्योग व्यवसाय वाढतील का यावर ६५ टक्के वाचकांनी सकारात्मक उत्तर देत होय सांगितले. २० टक्के वाचक काही प्रमाणात सांगतात. ५ टक्के वाचकांना माहिती नाही तर १० टक्के म्हणतात उद्योग व्यवसाय वाढीस लागणार नाही.

Web Title: Dryport is beneficial for the district ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.