शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कृउबामध्ये धान्याची आवक निम्म्यावर

By admin | Updated: June 9, 2015 00:16 IST

बीड : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिके पिकली नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली.

बीड : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिके पिकली नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली. येथे अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृउबात धान्य आणण्यास पाठ फिरवली. याचा परिणाम कृउबाच्यसा उत्पन्नावरही जाणवला.े मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उसनवारीच्या पैशावर शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र, शेतकऱ्यांना अपक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. खरीपासह रबी पिकांनीही दगा दिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, कापूस या पिकांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हाती निम्मेच उत्पादन पडले. त्यामुळे शेतकरी खचून गेला. सध्या बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला १५५० ते २२०० रूपये भाव आहे. बाजरीला १३०० ते १६०० तर गव्हाला १८०० ते २५०० रूपये भाव दिला जात असल्याचे सचिव आर. पी. बहीर यांनी सांगितले. भाव पडले, आवकही घटली गतवर्षी बीड कृउबाअंतर्गत साडेपाच लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ४५०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला. यावर्षी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान कापूस खरेदी झाली. यावर्षी मात्र, केवळ साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी होऊन चार हजार ते ४१०० रूपये प्रती क्विंटल कापसाला भाव मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. तूर सात हजाराने घटली गतवर्षी तुरीची आवक १२ हजार क्विंटल एवढी होती. ४३०० रूपये भाव तुरीला मिळाली. यावर्षी मात्र तुरीच्या भावात २०० रूपये वाढ होऊन भाव ४५०० रूपये झाला. आवक मात्र पाच हजार क्विंटलच झाली, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)