कोरडे दाम्पत्याने दिला शेतकऱ्यांसाठी रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:13+5:302021-01-13T04:10:13+5:30
खुलताबाद : शेतीच्या बांधावरून ग्रामीण भागात सर्वाधिक वादविवाद होत असल्याच्या घटना नेहमी कानावर पडतात, परंतु शेजारच्या १५ शेतकऱ्यांना त्यांच्या ...

कोरडे दाम्पत्याने दिला शेतकऱ्यांसाठी रस्ता
खुलताबाद : शेतीच्या बांधावरून ग्रामीण भागात सर्वाधिक वादविवाद होत असल्याच्या घटना नेहमी कानावर पडतात, परंतु शेजारच्या १५ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी आपल्या शेतातून जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता देत, त्याची रजिस्ट्री अलका व विलास कोरडे या दाम्पत्याने करून दिली आहे. शेतीच्या बांधावरून अनेक गावांत रक्ताच्या नात्याला गोलबोट लागल्याच्या घटना आहे. यासह शिवरस्त्याचे बहुतांश विषय प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असल्याचे चित्र आहे. अशातच खिर्डीच्या दाम्पत्याने सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवत, आपल्या शेतीतून इतरांसाठी रस्ता दिल्याने त्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांनी आभार मानले.
औरंगाबाद येथील रहिवासी अलका व विलास कोरडे यांची खुलताबाद तालुक्यातील खिर्डीत गट नंबर १४१ मध्ये शेती आहे. या भागातील १२ ते १५ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्या नसल्याने कोरडे दाम्पत्यांनी संबंधिताच्या अडचणींचा समजून घेत त्यांना आपल्या शेतातून रस्ता देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, कोरडे दाम्पत्यांनी त्यांच्या शेतीतून गाडी रस्ता रहदरीसाठी कायमस्वरूपी देत, तो रजिस्ट्री करून देत, एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला. यामुळे खिर्डी येथील शेतकऱ्यांनी कोरडे दाम्पत्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कोरडे यांच्या निर्णयामुळे रामदास हिवर्डे, बाबासाहेब हिवर्डे, प्रभाकर दत्तू, कैलास हिवर्डे, देवनाथ हिवर्डे, सुरेश हिवर्डे, किशन धोत्रे, त्रिंबक धोत्रे, सुभाष हिवर्डे, समाधान गायके, रतन गायके, राहीबाई गायके आदी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळाला आहे. यावेळी दिनेश सावजी, संतोष ठेंगडे, अतिक पठाण, अनिल गावनडे आदी उपस्थित होते.
-- कॅप्शन : अलका व विलास कोरडे दाम्पत्यांच्या सत्काराप्रसंगी खिर्डीतील शेतकरी व नागरिक.