विशेष मोहिमेत दारूसाठा जप्त
By Admin | Updated: July 7, 2014 00:33 IST2014-07-06T23:57:10+5:302014-07-07T00:33:13+5:30
हिंगोली : जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी ३ जुलै रोजी विशेष मोहिम राबविली. या मोहिमेमध्ये एकुण १२ आरोपींविरुद्ध कारवाई करून अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
विशेष मोहिमेत दारूसाठा जप्त
हिंगोली : जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी ३ जुलै रोजी विशेष मोहिम राबविली. या मोहिमेमध्ये एकुण १२ आरोपींविरुद्ध कारवाई करून अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी केलेल्या या कारवाईत देशी दारुच्या १७८ बाटल्या, गावठी हातभट्टीची ५५ लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी बाबुराव भाऊराव कदम (रा. एकरुखा), बंडू उमाजी मलांडे (रा. करंजी, ता. वसमत), मारोती सखाराम सानप (रा. साळणा, ता. औंढा), रमेश धनाजी पवार (रा. बुखारी तकीया, वसमत), विश्वनाथ चोखाजी मरवटे (रा. पेठ वडगाव), संदीप गोविंद पवार (रा. येहळेगाव ता. कळमनुरी), केशव राजाराम करंडे (रा. साळवा ता. कळमनुरी), सुंदर रुस्तुम मोरे (रा. चिंचोली ता. औंढा), शंकर मानसिंग चव्हाण (रा. भाटेगाव ता. कळमनुरी), अनिल केशव राठोड (चुंचा), विठ्ठल तानाजी माने (रा. दाटेगाव) आणि शेख जमील शेख सुभान (रा. करंजी ता. वसमत) यांच्या विरुद्ध दारुबंदी कायद्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ हजाराचा दारुसाठा जप्त
औंढा, वसमत, कळमनुरी, नर्सी ठाण्याच्या हद्दीत ४ जुलै रोजी पोलिसांनी छापे टाकुन चौघांवर कारवाई केली.
यामध्ये आरोपी सखाराम इंगळे (येहळेगाव), राजेश बाबाराव शिंदे (जलालदाभा), सुभाष अमृता इंगोले (रा. जवळा), दिलीप विठ्ठलराव रेणगडे (भोईगल्ली, वसमत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याजवळून देशी दारुच्या १९८ बाटल्या व १ मोटारसायकल असा एकुण २२ हजार १५३ रुपये किंमतीचा अवैध दारुचा साठा जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)