पावणेतीन लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:04 IST2017-10-02T00:04:28+5:302017-10-02T00:04:28+5:30

परतूर येथील बसस्थानक परिसरातील एका घरात रविवारी छापा टाकून पोलिसांनी दोन लाख ८० हजार रुपये किमतींचा गांजा जप्त केला.

Drugs seized | पावणेतीन लाखांचा गांजा जप्त

पावणेतीन लाखांचा गांजा जप्त

जालना : परतूर येथील बसस्थानक परिसरातील एका घरात रविवारी छापा टाकून पोलिसांनी दोन लाख ८० हजार रुपये किमतींचा गांजा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी एका संशयिताला अटक केली.
परतूर येथील बसस्थानकाच्या मागील बाजूस एक व्यक्ती गांजा विक्री करत असल्याची मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिं यांनी पथकासह जाऊन छापा टाकला. या ठिकाणी संशयित शेख आसेफ शेख हुसेन (५८) याने घरातील लोखंडी पलंगाच्या खाली प्लॉस्टिकच्या पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठविल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून २८ किलो गांजा जप्त केला. संशयित शेख आसेफ शेख हुसेन याच्यावर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहाय्यक उपनिरीक्षक शेख रज्जाक, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, फुलसिंग घुसिंगे, सदाशीव राठोड, विष्णू कोरडे, किरण मोरे, निमा घनघाव यांनी ही कारवाई केली.

Web Title: Drugs seized