शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंदरची किंमत कमी होणार?
4
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
5
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
6
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
7
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
8
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
9
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
10
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
11
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
12
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
14
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
15
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
16
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
18
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
19
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
20
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भंगारच्या आडून ड्रग्जचा गोरखधंदा; मायलॉन फार्मा कंपनीत पोलिसांकडून झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:31 IST

पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा देत चौकशीसाठी पाचारण केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : औषधी कंपनीच्या वेस्टेजमधून मेफेड्राॅनची (एमडी) तस्करी करण्यात येत असल्याचा पर्दाफाश एनडीपीएसच्या पथकाने केला. यात प्रकरणात भंगार व्यावसायिकास अटक केल्यानंतर सर्व आरोपींना मायलॉन फार्मा कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी घेऊन जात पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्याशिवाय पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा देत चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यातून कंपनीतील कोणाचा सहभाग आहे का? याची माहिती समोर येणार आहे.

वाळुज एमआयडीसी परिसरातील भंगार व्यावसायिक बबन खान यांच्यासह त्याची मुले कलीम खान, सलीम खान, ट्रकचालक शफीफुल रहमान तफज्जुल हुसैन आणि राज अजुरे या पाच जणांना ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केलेले आहे. यातील मुख्य आरोपी बबन खान यास मायलॉन कंपनीतील भंगाराचे कंत्राट २०११ साली मिळाले होते. या भंगाराच्या गाड्यातूनच बबन खान हा कंपनीच्या वेस्टेजमधून अमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारे रसायन पिशव्यामध्ये काढून गोडाऊनमध्ये जमा करीत होता. हे रासायनिक पावडर मुंबईसह इतर राज्यात पाठविण्यात येत होती. त्यातून बबन खान याने कोट्यवधींची माया जमवल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. या रॅकेटमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर येण्याची शक्यता आहे. अटक पाचही आरोपींना पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तपास अधिकारी तथा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार, ‘एनडीपीएस’च्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह पथकाने वाळुज एमआयडीसीतील मायलॉन कंपनी गाठली. त्याठिकाणी सर्व आरोपींनीही नेण्यात आले. भंगार जमा करण्याची, त्याचे गेट पाससह इतर प्रकारची माहिती पोलिसांच्या पथकाने जमा केली. तसेच कंपनी येणारे रसायन, त्याचा वापर आणि वेस्टेजची लावण्यात येणारी विल्हेवाट याविषयी संपूर्ण माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनी अधिकाऱ्यांची होणार चौकशी

मायलॉन कंपनीतील भंगाराच्या कंत्राट देण्यासह वेस्टेजची विल्हेवाट लावणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी गुन्हे शाखेचे पथक करणार आहे. त्यासाठी संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या चौकशीत कंपनीतील कोणाचा या गोरखधंद्यात सहभाग आहे की नाही, याचा माहिती समोर येणार आहे. वेस्टजेची विल्हेवाट लावताना आरोपी बबन खान यास रासायनिक पावडर देणाऱ्यांची नावेही समोर येतील, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात कंपनीसह राज्यभरात पाठविण्यात येणाऱ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ