धान्यटंचाई संपली
By Admin | Updated: May 28, 2014 00:26 IST2014-05-28T00:08:49+5:302014-05-28T00:26:55+5:30
उस्मानाबाद : कोणही उपाशीपोटी राहू नये, या उद्देशाने अन्नसुरक्षा योजना सुरू करण्यात आली. या योजनेला जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला.

धान्यटंचाई संपली
उस्मानाबाद : कोणही उपाशीपोटी राहू नये, या उद्देशाने अन्नसुरक्षा योजना सुरू करण्यात आली. या योजनेला जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासाही मिळाला. परंतु, या योजनेत समावेश होऊ न शकलेल्या सुमारे १ लाखावर शिधापत्रिकाधारकांसाठीचे धान्य रेशन दुकानांमध्ये दोन महिन्या पासून धान्य उपलब्ध झाले नव्हते. मात्र, मे महिन्यात तांदूळा बरोबर गहू प्रशासनाला प्राप्त झाल्याने एपीलधारकांची धान्य टंचाई आता संपली आहे. जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेची अमंलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरु झाली. जिल्ह्यातील ११ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. यांच्यासाठी प्रतिमहा ८२१९.४८५ मेट्रिक टन इतके धान्य लागते. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो प्रमाणे गहू, ३ रुपयांप्रमाणे तांदूळ तर १ रूपयांप्रमाणे भरडधान्य वितरित केले जात आहे. मात्र एपीएल धारकांना गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनाकडून धान्य पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८८६ लाभार्थी शिधापत्रिका धारकांना धान्याची टंचाई जाणवत होती. या लाभार्थ्यांना जवळपास तीन महिन्यापासून रेशनचे धान्य मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना महागडे अन्नधान्य खरेदी करावे लागत आहे. दरम्यान, शासनाने आता २९ हजार ८१० मे.टन तांदूळ खरेदी करुन तो एपीएल शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानावरुन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याने, सद्या ९ रूपये ६० पैसे प्रती किलो याप्रमाणे प्रति कार्ड ५ किलो या प्रमाणे याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच ७ रुपये २० पैसे प्रती किलो याप्रमाणे प्रति कार्ड १० किलो गहू देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी) अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधाकांची संख्याही १ लाख १६ हजार ८८६ इतकी आहे. तर सदस्य संख्या ४ लाख ३९ हजार १५६ इतकी आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १ लाख २३ हजार ४०९, तुळजापूर ८६ हजार ५३८, उमरगा ७५ हजार ५२४, लोहारा २३ हजार २२०, भूम २९ हजार ४०, परंडा ३१ हजार २७८ , कळंब ५२ हजार २५५ आणि वाशी तालुक्यात १७ हजार ८९२ सदस्यांचा समावेश आहे. गोदाम निहाय लाभार्थी (धान्य क्विंटल) गोदामाचे नावकार्डसंख्यागहूतांदूळ उस्मानाबाद१७५६१ १२०५८७५ तेर४०२८ २७६२०१ ढोकी५२२६ ३५९२६१ बेंबळी३५०० २४०१७४ तुळजापूर१०७५० ७३८५३६ नळदूर्ग७२६७ ४९९३६२ उमरगा२१२८१ १४६०१०६१ मुरुम७४२९ ५१०२४६ लोहारा५०७८ ३४८२५३ कळंब३३१७ २२८१६५ येरमाळा२५५९ १७५१२८ शिराढोण२५१८ १७३१२६ भूम८१४५ ५५९४०६ परंडा६६५१ ४५६३३२ अनाळा३९५२ २७१२०० वाशी७६२४ ५२३३८० एकुण११६८८६ ८०२०५७०६