शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती

By विकास राऊत | Updated: November 13, 2023 15:13 IST

४६ मंडळात कमी पाऊस, सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ४६ मंडळांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शासनाने ४० तालुक्यांव्यतिरिक्त १,०२१ मंडळांत नव्याने दुष्काळ जाहीर केला असून, त्यात जिल्ह्यातील मंडळांचा नव्याने समावेश झाला आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने जाहीर केला आहे. त्यात जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ४६ मंडळांचा समावेश करण्यात आला असून, ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात या गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे. एका मंडळात सरासरी २० गावांचा समावेश होतो. त्याआधारे जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती असणार आहे.

जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने १० नोव्हेंबर रोजी जाहीर केला.

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर, नांदर, लाेहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, पिंपळवाडी, विहामांडवा, फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री, आळंद, पीरबावडा, वडोद बाजार, वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी खुर्द, गारज, लासूरगाव, महालगाव, नागमठाण, लाडगाव, गंगापूर तालुक्यातील गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवादा, तुर्काबाद, वाळूज, हर्सूल, सिद्धनाथ प., खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, सुलतानपुरा, बाजरसावंगी या मंडळांत, सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, निल्लोड, भराडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड तालुक्यातील कन्नड, चापानेर, देवगाव रंगारी, चिकलठाणा, पिशोर, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, करंजखेड या मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

काय मिळणार लाभ?जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शैक्षणिक शुल्क माफ, रोहयोंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांची वीज खंडित न करणे आदी लाभ दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील मंडळांतर्गत मिळतील.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस