शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दुष्काळी मराठवाड्यात शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी अहमदनगरच्या उसावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:46 IST

भाव कडाडले तरी पशुधनासाठी खरेदी

ठळक मुद्देलासूरमध्ये २५० टनाची दररोज विक्री खरेदीसाठी होतेय शेतकऱ्यांची गर्दी

लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांच्या वैरणासाठी लागणाऱ्या उसाचे भाव कडाडले असून मंगळवारी लासूर स्टेशन येथे प्रति टन उसासाठी ४४०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागले. 

आधीच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दररोज २५० टनाहून अधिक उसाची हातोहात विक्री होत आहे. तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शेतकऱ्यांना शेतमाल तर झालाच नाही. पाठोपाठ वर्षभर पुरेल इतका चाराही झाला नाही. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांपुढे जनावरांना सांभाळण्याचे मोठे संकट उभे ठाकले होते. मोठी कसरत करीत हिवाळ्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी जनावरांची व्यवस्था केली. परंतु आज रोजी वाढलेल्या चाऱ्याच्या भावामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे.

नगर जिल्ह्यातून येतो ऊस       ऊस घेण्यासाठी येथे स्थानिक शेतकऱ्यांसह वैजापूर, देवगाव, कन्नड व खुलताबाद भागातून शेतकरी येत आहेत. त्यामुळे येथे येणारा ऊस खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत आहे. त्यामुळे सहाजिकच उपलब्ध असलेला ऊस हा चढ्या भावाने विक्री होत आहे. स्वत:कडे चारा उपलब्ध नसल्यामुळे मिळत असलेल्या भावानुसार शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, भेंडा, शेवगाव परिसरातून आज आलेला ऊस तब्बल चार हजार चारशे रुपये प्रति टनाने हातोहात विक्री झाला आहे.

पर्याय नसल्याने चढ्या भावाने खरेदी गुरांना खाऊ घालण्यासाठी सध्या आमच्याकडे काहीच शिल्लक नसल्यामुळे मिळत असलेल्या भावात ऊस घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे पोटूळ येथील शेतकरी जगन्नाथ कापसे यांनी सांगितले. दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे इतक्या मोठ्या भावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे, असे धामोरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर कोकरे यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी