‘पाणी थेंब थेंब गळं’ !
By Admin | Updated: April 11, 2015 00:20 IST2015-04-11T00:02:21+5:302015-04-11T00:20:59+5:30
राजेश खराडे , बीड बिंदूसरा धरणाचे पाणी बंद झाल्यामुळे शहरावर जलसंकट घोंगावत असताना माजलगाव बॅक वॉटरमधून येणाऱ्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागली आहे.

‘पाणी थेंब थेंब गळं’ !
राजेश खराडे , बीड
बिंदूसरा धरणाचे पाणी बंद झाल्यामुळे शहरावर जलसंकट घोंगावत असताना माजलगाव बॅक वॉटरमधून येणाऱ्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. थेंब थेंब गळणाऱ्या या पाण्याने टंचाईत भरच पडू लागली आहे.
‘लोकमत’ने शुक्रवारी बॅक वॉटर योजनेच्या पाईपलाईनची गळती कॅमेऱ्यात कैद केली. नाळवंडी परिसरातील चार ठिकाणच्या व्हॉल्वला लिकेज झाले आहे. लिकेजमधून गळणाऱ्या पाण्याचा वापर काही महिला धुणी धुण्यासाठी करतात तर काही ठिकाणी लहान मुले पाण्यात खेळतानाही दिसून आली.
अंथरवण पिंप्री रस्त्यावर काही मुले सायकलवरून लिकेजचे पाणी वाहून नेताना दिसले. मात्र, हे पाणी २४ तास गळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाया जाते. शहरातील अनेक भागांमध्ये हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची कसरत सुरू आहे. पालिकेने नळांना तोट्या बसवून अपव्यय टाळावा, असे आवाहन केले आहे.
दुसरीकडे मात्र, पालिकेने शहराला आणलेल्या पाण्याच्या पाईपलाईनाच गळती आहे. लिकेज दुरूस्तीसाठी पालिकेकडे वेळ नसल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.