सेनेने वाजवला बँकेसमोर ढोल
By Admin | Updated: July 11, 2017 00:24 IST2017-07-11T00:23:21+5:302017-07-11T00:24:15+5:30
हिंगोली : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या बोर्डावर डकविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.

सेनेने वाजवला बँकेसमोर ढोल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या बोर्डावर डकविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक सहभागी झाले होते.
युती शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची अजून अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय आपले कर्ज माफ झाले की नाही, झाले तर किती झाले, याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाच्या कानाचे पडदे उघडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले. जिल्हा कार्यालयापासून ढोल वाजवत शिवसैनिक इंदिरा गांधी चौक, गांधी चौक जवाहर रोड मार्गे जिल्हा बँकेवर धडकले. तेथेही ढोल वाजवण्यात आला. संपूर्ण कर्जमाफीसाठी घोषणाही देण्यात आल्या.
संतोष बांगर यांच्यासह जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उद्धवराव गायकवाड, रामेश्वर शिंदे, बाळासाहेब मगर, दिलीप घुगे, संतोष सारडा, परमेश्वर मांडगे, मुन्ना यादव, डॉ.रमेश शिंदे, कडूजी भवर, फकिरा मुंढे, अशोक नाईक, भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे, डी. वाय. घुगे, गोपू पाटील, बाजीराव सवंडकर, राम कदम, संदीप मुदिराज, रामराव घुळघुळे, गणेश शिंदे आदी पदाधिकारी हजर होते.