ड्रायपोर्टच्या कामास मे महिन्यात प्रारंभ..!

By Admin | Updated: April 13, 2016 00:48 IST2016-04-13T00:44:16+5:302016-04-13T00:48:32+5:30

राजेश भिसे , जालना बहुचर्चित ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या सर्वेक्षणचे काम पूर्ण झाले असून, पुढील महिन्यापासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Driving work start in May ..! | ड्रायपोर्टच्या कामास मे महिन्यात प्रारंभ..!

ड्रायपोर्टच्या कामास मे महिन्यात प्रारंभ..!


राजेश भिसे , जालना
बहुचर्चित ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या सर्वेक्षणचे काम पूर्ण झाले असून, पुढील महिन्यापासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील दरेगाव आणि जवसगाव येथे ५०० एकरमध्ये ड्रायपोर्ट प्रकल्प होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २५ डिसेंबर २०१५ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यानंतर राज्यातील वर्धा आणि जालना येथे प्रकल्प मंजूर करण्यात आला.
समुद्र किनाऱ्यावरील पोर्टच्या धर्तीवर ड्रायपोर्ट स्थापन करण्यात यावे, अशी संकल्पना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. यावर विविधांगी अभ्यास करण्यात आल्यानंतर तसेच ड्रायपोर्टचे महत्त्व लक्षात घेऊन त्या त्या भागातील होणारा विकास हा केंद्रबिंदू मानून वर्धा आणि जालना येथे ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्यात यावा, असा विचार पुढे आला.
दुष्काळी स्थिती आणि मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या उद्योगांना यातून बाहेर काढण्यासाठी तसेच जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी हा प्रकल्प गरजेचा होता. त्यानुसार जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्याची शिफारस केंद्रीय जहाज बांधणी मंत्री गडकरी यांनी केली. त्यानुसार या प्रकल्पासाठी जालना जिल्ह्यातील दरेगाव आणि जवसगाव येथील जवळपास दीडशे एकर जमिन संपादीत करण्यात आली. तर उर्वरित जमिन ही शासनाचीच आहे. हा प्रकल्प एकूण ५०० एकर जागेवर आकारास येत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम कधी सुरू होईल, याकडे उद्योग जगतासह शेतकऱ्यांचे लागून होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसाद कन्सल्टींग एजन्सीला या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले.
गत तीन ते चार महिन्यांपासून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी या एजन्सीने युद्धपातळीवर काम केले. या प्रकल्पाचा कृती आराखडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात आला. त्यात गडकरी यांनी सेझ, दालमिल, आईल मिल आदी उद्योगांसाठी भूखंड राखीव ठेवण्याबाबतच्या काही सुधारणा सूचविल्या. त्यानंतर या सुधारणा करुन कृती आराखडा जेएनपीटीकडे सादर करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यानुसार पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

Web Title: Driving work start in May ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.