गाड्या ओढण्याचा कार्यक्रम
By Admin | Updated: May 10, 2014 23:52 IST2014-05-10T23:30:40+5:302014-05-10T23:52:30+5:30
परंडा: येथील सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन यांच्या उरूसानिमित्त शनिवारी जुन्या तहसील कार्यालयापासून भाविकांनी भरलेल्या १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला़

गाड्या ओढण्याचा कार्यक्रम
परंडा: येथील सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन यांच्या उरूसानिमित्त शनिवारी जुन्या तहसील कार्यालयापासून भाविकांनी भरलेल्या १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला़ कार्यक्रमास परंडा शहरासह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ परंडा शहरातील जुन्या तहसील कार्यालयापासून शनिवारी सायंकाळी भाविकांनी भरलेल्या १२ बैलगाड्या कंधार (ताक़रमाळा) येथील दत्तात्रय रामू काळे याने कंबरास दोरखंड बांधून मंडईपेठ येथील क्रांती चौकापर्यंत ओढल्या़ पहिल्या गाडीत गटनेता जाकीर सौदागर, नगरसेवक मैनुद्दीन कुरेशी यांना बसण्याचा मान मिळाला़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरूस कमिटीचे अध्यक्ष मुर्शीद मुजावर, माजी नगरसेवक शब्बीर खाँ पठाण, बुरानोद्दीन पठाण, माजी नगराध्यक्ष अकिल जिनेरी, सत्तार सय्यद, एजाज मुजावर, उमर मुजावर, गंब्बु सौदागर, रफिक मुजावर, समीद मुजावर आदीनी परिश्रम घेतले़ तर शुक्रवारी रात्री १० वाजता कौसर साबरी (मुंबई) व सुलतान नाझा (पुणे) यांच्यात कव्वालीची चांगलीच जुगलबंदी रंगली़ पहाटे तीनपर्यंत चाललेला कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती़ हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ (वार्ताहर)