विजेता कोचिंग क्लासेसचा चालक नाट्यमयरीत्या गायब
By Admin | Updated: April 26, 2015 01:02 IST2015-04-26T00:55:57+5:302015-04-26T01:02:36+5:30
औरंगाबाद : कोचिंग क्लासेसमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून शहरातील विद्यार्थ्यांचे पालक, सहकारी कर्मचारी, शिक्षक आणि बाजारपेठेतील अनेक व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये

विजेता कोचिंग क्लासेसचा चालक नाट्यमयरीत्या गायब
औरंगाबाद : कोचिंग क्लासेसमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून शहरातील विद्यार्थ्यांचे पालक, सहकारी कर्मचारी, शिक्षक आणि बाजारपेठेतील अनेक व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केल्यानंतर विजेता कोचिंग क्लासेसचा चालक शनिवारी फरार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याने फरार होताना आपल्या गायब होण्यास काही लोक जबाबदार असल्याच्या चिठ्ठ्या घरात ठिकठिकाणी चिकटवून ठेवल्या आहेत.
कुलवंत सिंग माकेन असे फरार झालेल्या कोचिंग क्लासेसच्या चालकाचे नाव आहे. विजेता कोचिंग क्लासेस नावाने त्याने सिडको एन-३, समर्थनगर आणि उस्मानपुरा येथे शाखा सुरू केल्या होत्या. येथे सीबीएसई आणि एसएससी बोर्डाच्या ७ वी ते १२ वीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकविले जात होते. पूर्वी विद्यार्थी संख्याही बऱ्यापैकी होती; यंदा विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.