चालकाला लागली डुलकी, अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 11:18 IST2017-07-22T11:18:48+5:302017-07-22T11:18:48+5:30

हैद्राबाद विमानतळावरून नांदेडकडे जाण्या-या व्यापा-यांच्या कारला बिलोलीजवळ जीपसोबत पहाटे ५.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला.

The driver took a nap, three killed in the accident | चालकाला लागली डुलकी, अपघातात तीन ठार

चालकाला लागली डुलकी, अपघातात तीन ठार

ऑनलाईन लोकमत/ राजेश गंगमवार 

 
नांदेड/बिलोली : हैद्राबाद विमानतळावरून नांदेडकडे जाण्या-या व्यापा-यांच्या कारला बिलोलीजवळ जीपसोबत  पहाटे ५.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला. दोन्ही वाहने समोरासमोरील धडकल्याने कारमधील नांदेडची २ व्यापारी व जीपमधील १ जण जागीच ठार झाले. 
 
सिंगापूर दौरा आटपून नांदेडची व्यापारी हैद्राबाद विमानतळावरून कारने (एमएच २६-बीसी-८०००) नांदेडला निघाली होती. बिलोली शहरापासून बोधन मार्गावर आल्यानंतर कारच्या चालकाचे झोपेमुळे गाडीवरील नियंत्रण गेले कार  बिलोलीहून हैद्राबादकडे निघालेल्या जीपवर (एमएच २६-एके-०१८०) जाऊन धडकली. यात जीपमधील भगवान प्रचंड(४० ) व कारमधील रवींद्र गुरुपवार(३४), उमेश जांगीड (३५) जागीच ठार झाली. रविंद्र व उमेश यांचा नांदेड मध्ये सिमेंटचा व्यापार आहे. 
 
अपघातात कारचालक राजपाल ठक्कर व सुदर्शन पाटील, जीपमधील मुन्ना पोबाडे व ज्ञानेश्वर गुडमे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. 
 

Web Title: The driver took a nap, three killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.