वाळूचे ट्रॅक्टर पकडल्याने चालकाने घेतले विष!
By Admin | Updated: November 8, 2016 00:25 IST2016-11-08T00:27:20+5:302016-11-08T00:25:25+5:30
जालना : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास तहसीलदारांनी पकडल्याने चालकाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नांजा येथे घडली.

वाळूचे ट्रॅक्टर पकडल्याने चालकाने घेतले विष!
जालना : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास तहसीलदारांनी पकडल्याने चालकाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नांजा येथे घडली. सुनील बंडू बावणे असे चालकाचे नाव आहे.
पूर्णा नदीतून अवैध होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार रूपा चित्रक यांच्याकडे केली होती. सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नदी पात्रातून दोन ट्रॅक्टर वाळू भरून नेत असल्याची माहिती चित्रक यांना ग्रामस्थांनी दिली. तहसीलदारांनी नांजा येथील नदीपात्रात जाऊन वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले. एक ट्रॅक्टर चालक पळून गेला तर दुसऱ्या चालक धास्तावून त्याने नदी पात्रातून पळून जाऊन विष प्राशन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तहसीलदार रूपा चित्रक म्हणाल्या, नदीपात्रातून चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची ग्रामस्थांच्या तक्रारीवरूनच ही कारवाई केली. कारवाई दरम्यान वाळूने भरलेला ट्रॅकर आढळून आले. ट्रॅक्टरचा चालक आढळून आला नव्हता तो पळून गेला वाळूचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पोलिसात तक्रार दिली आहे.