शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
3
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
4
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
5
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
6
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
7
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
8
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
9
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
10
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
11
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
12
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
13
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
14
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
15
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
16
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
17
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
18
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
19
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
20
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी

चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:15 IST

सावंगी टोलनाक्याजवळील घटना : ३५ प्रवाशांचा वाचला जीव

सिल्लोड : सिल्लोड-नाशिक एसटी बस घेऊन जाताना अचानक बसचालकाच्या छातीत दुखू लागले. चक्कर येऊन त्यांनी तशीच स्टिअरिंगवर मान टाकली. तत्पूर्वी त्यांनी इशारा केल्यामुळे वाहकाने केबिनमध्ये धाव घेत हाताने ब्रेक दाबून बसला नियंत्रित केले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवर सावंगी टोलनाक्याजवळ घडलेल्या या घटनेत ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

सिल्लोड आगारातील बसचालक काळे व वाहक अमोल गोसावी हे रविवारी सकाळी आठ वाजता सिल्लोड-नाशिक ही बस घेऊन सिल्लोडहून नाशिककडे निघाले होते. चौका घाटाच्या पुढे सावंगी टोलनाक्याजवळ ९:३० वाजता चालक काळे यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना चक्कर येताच त्यांनी वाहक गोसावी यांना बस कंट्रोल करा, असे म्हणत स्टिअरिंगवर मान टाकली. आणीबाणीची ही स्थिती लक्षात येताच वाहक गोसावी यांनी तत्काळ चालकाच्या केबिनमध्ये धाव घेतली. चालक काळे यांच्या पायाखाली असलेल्या ब्रेकवर त्यांनी हाताने दाब देऊन धावती बस नियंत्रित करून थांबविली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या दरम्यान गोंधळ उडून सर्व प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता. मात्र बस सहीसलामत थांबल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले; तर प्रवाशांना वाहकाने दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले.

डॉक्टर दाम्पत्य आले धावूनबस थांबल्यानंतर पाठीमागून एक डॉक्टर पत्नी व छोट्या मुलासह मोटारसायकलवरून जात असताना तेथे आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरनी चालक काळे यांची तपासणी केली. त्यांनी लगेच त्यांना दवाखान्यात घ्यावे लागेल, असे सांगितले. दरम्यान, एका कारमधील व्यक्तींनी त्यांच्या कारमध्ये बसवा, असे सांगितले. तेव्हा सदर डॉक्टर आपल्या फॅमिलीला तेथेच रस्त्यावर थांबवून चालक काळे यांच्यासोबत रुग्णालयात रवाना झाले. काळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरstate transportएसटीAccidentअपघात