शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पैशाच्या वादातून चालकाचा खून; चार दिवसांनंतर जीपमध्ये आढळला मृतदेह, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 13:17 IST

रांजणगाव जीप चालकाच्या खून प्रकरणाचा ८ तासांत उलगडा

वाळूजमहानगर: पैशाच्या कारणावरून रांजणगावच्या जीपचालक सुधाकर पुंडलिक ससाणे (वय 35 रा वाघोडा ता मंठा जि जालना, ह मु मंगलमूर्ती कॉलनी, रांजणगाव ) यांचा खून करणाऱ्या आरोपीचा अवघ्या 8 तासात छडा लावण्यात गुन्हे शाखा व वाळूज पोलिसांना यश आले आहे.आरोपी तौफिक  रफिक शेख (२४, रा. पत्रा कॉलनी, वाळूज) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रांजणगाव येथील सुधाकर पुंडलिक ससाणे यांच्याकडे क्रुझर जीप क्रमांक एम एच 29, इ वाय 5827) असून ते किरायेने जीप चालवितात. रविवारी सकाळी 8 वाजता मी भाडे घेऊन जात आहे, असे घरी सांगून सुधाकर ससाणे हे घराबाहेर पडले होते. मात्र चार दिवसांपासून ते घरी न परतल्याने तसेच ते मोबाईल फोन उचलत नसल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. सर्वत्र शोध घेऊन ही सुधाकर ससाणे यांचा शोध लागत नसल्याने त्यांचे लहान भाऊ सुभाष ससाणे यांनी मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोहेका राम तांदळे व सुधाकर यांचा लहान भाऊ सुभाष हे दोघे वाळूज परिसरात शोध घेत होते. 

बेपत्ता सुधाकर यांचे मोबाईल लोकेशन वाळूजच्या गरवारे कंपनीजवळ येत असल्याने पोहेका राम तांदळे व सुभाष ससाणे यांनी गरवारे कम्पनी समोर शोध मोहीम सुरू केली. यावेळी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनी समोरील सर्व्हिस रोडवर सुधाकर यांची जीप दिसून आली. यानंतर जीपची पाहणी केली असता प्रचंड दुर्गंधी येत असल्याने पोहेका तांदळे यांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उज्जवला वनकर, सहाय्यक आयुक्त अशोक थोरात, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक लक्षमन उंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जीप मधील मधल्या सीटवर पोत्यांत ठेवलेला  अर्धनग्न अवस्थेत सुधाकर ससाणे यांचा मृतदेह बाहेर काढत शव विच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

अवघ्या ८ तासात उलगडा झालाजीप चालक सुधाकर ससाणे यांचा खून झालेल्या ठिकाणी दोन मोबाईल मिळून आले होते. यातील एक मोबाईल सुधाकर यांचा तर दुसरा मोबाईल आरोपींचा असल्याचा अंदाज घेत पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम सुरू केली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक व वाळूज पोलिसांनी आज बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाळूजच्या पत्रा कॉलनीत छापा मारून संशयित आरोपी तौफिक रफिक शेख (२४) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी तौफिक याची कसून चौकशी केली असता त्याने पैशाच्या वादातून सुधाकर ससाणे याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद