दीड हजार शेतकऱ्यांना ठिबक अनुदानाचा लाभ

By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:13+5:302016-04-03T03:50:37+5:30

लातूर : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झालेल्या लातूर जिल्ह्यातील १ हजार ६९६ शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळाला आहे़

Drip subsidy benefit to one and a half thousand farmers | दीड हजार शेतकऱ्यांना ठिबक अनुदानाचा लाभ

दीड हजार शेतकऱ्यांना ठिबक अनुदानाचा लाभ


लातूर : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झालेल्या लातूर जिल्ह्यातील १ हजार ६९६ शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळाला आहे़ जवळपास ५ कोटी ६४ लाख रुपये शासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहेत़ लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून चार दिवसांत संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे़
लातूर जिल्ह्यातील ३ हजार ४२८ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या सेटसाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी पूर्वसंमती मिळालेल्या १७८१ अर्जापैकी १६९६ अर्ज अनुदानास पात्र झाले आहे़ पात्र लाभार्थ्यांसाठी ५ कोटी ६४ लाख ५७ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ कृषी विभागाकडून लाभार्थ्यांच्या अपडेट याद्या करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे़ चार दिवसांमध्ये १६९६ लाभार्थ्यांच्या खात्यावर सदरील अनुदान जमा होणार आहे़ दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानामुळे काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे़
लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत फळबाग धारकांना व ऊसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा परिस्थितीतही आपले पीक कायम ठेवता यावे यासाठी शासनाने ठिबक सिंचनची योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केली आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी २०१५-१६ मध्ये ४ हजार ३२८ जणांनी अर्ज केले होते़ त्यापैकी अहमदपूर तालुक्यातील ११६, औसा ३७५, चाकूर २२४, देवणी ६९, जळकोट ४०, लातूर २५९, निलंगा २०८, रेणापूर १२६, शिरुर अनंतपाळ ७२, उदगीर १०६ अशा एकूण १ हजार ६९६ अर्ज अनुदानासाठी पात्र ठरले आहेत़
या शेतकरी लाभार्थ्यांनी दुष्काळी परिस्थितीत आधार मिळावा यासाठी शासनाकडून २०१५-१६ साठी ५ कोटी ६४ लाख ५७ हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे़ त्यांनी हे अनुदान संबंधीत बँकेच्या शाखेकडे अनुदान जमा करण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या अपडेट करण्याचे काम सुरु केले आहे़
उर्वरीत १ हजार ४२९ लाभार्थ्यांचे अनुदान मात्र उर्वरीत बजेट आल्यानंतरच संबंधीत शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़

Web Title: Drip subsidy benefit to one and a half thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.