शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पानतावणे सरांची विद्यापीठातील ती २० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:04 AM

मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देअध्यापन : मराठी विभागातील एकाच केबिनमध्ये अभ्यास, मनन आणि चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.विद्यापीठातील मराठी विभागात ८ जून १९७७ रोजी प्रा. गंगाधर पानतावणे यांची सहायक प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यापूर्वी नागसेनवनातील मिलिंद विज्ञान महाविद्यालयात १९७२ पासून अध्यापनाचे कार्य केल्याचे मिलिंद विज्ञानचे प्राचार्य डॉ. राठोड यांनी सांगितले.

मराठी विभागात डॉ. पानतावणे यांना चौथ्या क्रमांकाची खोली मिळाली होती. या खोलीतच त्यांनी ८ जून १९७७ ते ३० जून १९९७ पर्यंत कार्य केले. १९९५ ते ९७ या कार्यकाळात त्यांनी मराठी विभागाचे प्रमुखपद भूषविले. या कार्यकाळातही त्यांचे काम याच खोलीतून होत असे. विभागप्रमुखांच्या खोलीत कामानिमित्ताने बसत. उर्वरित वेळी अभ्यास, चिंतन, वाचन करण्यासाठी चौथ्या क्रमांकाच्या खोलीचाच वापर करीत होते. डॉ. पानतावणे यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मराठीच्या शिक्षकांनी सर्व प्रकारचे साहित्य प्रकार, प्रवाहाच्या विषयात पारंगत असावे, असे त्यांचे मत होते. कारण विद्यार्थ्यांना ज्ञान देताना कोणत्याही प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून येऊ शकतो. त्याची तयारी अध्यापकाने केलीच पाहिजे, असाही नियम त्यांनी अध्यापन करताना पाळला.डॉ. पानतावणे सर मराठी विभागात वैचारिक वाङ्मय शिकवायचे. यात प्रामुख्याने फुले-शाहू-आंबेडकर या विचारांचा समावेश होता. दलित साहित्याचे भाष्यकार असतानाही ज्ञानेश्वरी हा विषय अप्रतिम शिकवत होते. त्यांच्या तासाला विद्यार्थी विषय नसला तरीही बसत. त्यांच्या तोंडून एकदा विषय ऐकला की, पुन्हा त्यावर अभ्यासही करावा लागत नसे, अशी माहिती त्यांचे विद्यार्थी राहिलेले डॉ. दासू वैद्य यांनी दिली.

टॅग्स :Asmitadarsh Movementअस्मितादर्श चळवळMarathwadaमराठवाडाDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDr.Gangadhar Pantawaneडॉ. गंगधर पानतावणे