जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्यांना ड्रेसकोड
By Admin | Updated: January 6, 2015 13:05 IST2015-01-06T13:05:16+5:302015-01-06T13:05:32+5:30
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचार्यांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्यांना ड्रेसकोड
नांदेड : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचार्यांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील दर सोमवारी अन शुक्रवारी कर्मचार्यांना ड्रेसकोडमध्येच कार्यालयात यावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांना यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी ओळखपत्र लावणे बंधनकारक केले होते. त्याचबरोबर कार्यालयात येण्याच्या अन जाण्याच्या वेळाबाबतही डॉ.परदेशी यांनी कर्मचार्यांना बर्यापैकी शिस्तीचे धडे दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला गती मिळाली होती.
त्यात आता जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनीही कार्यालयातील कर्मचार्यांवर विशेष लक्ष ठेवत त्यांच्यासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिला कर्मचार्यांना गुलाबी रंगाची साडी तर पुरुष कर्मचार्यांना पर्पल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
तर चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचा गणवेश हा पांढर्या रंगाचा राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फिरणार्या बाहेरच्या व्यक्ती सहजपणे ओळखता येवू शकणार आहेत. दर सोमवार आणि शुक्रवारी कर्मचार्यांना याच ड्रेसकोडमध्ये कार्यालयात यावे लागणार आहे. त्यामुळे कामात सूसुत्रता येणार आहे.