लोकमतमुळे पूर्ण होणार विमानात बसण्याचे स्वप्न...
By Admin | Updated: July 4, 2014 00:18 IST2014-07-03T23:29:26+5:302014-07-04T00:18:48+5:30
परतूर : लोकमतच्या वतीने आयोजित संस्काराचे मोती या स्पर्धेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा बालासाहेब ठाकर हिची विमान प्रवासासाठी निवड झाली आहे.

लोकमतमुळे पूर्ण होणार विमानात बसण्याचे स्वप्न...
परतूर : लोकमतच्या वतीने आयोजित संस्काराचे मोती या स्पर्धेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा बालासाहेब ठाकर हिची विमान प्रवासासाठी निवड झाली आहे.
लोकमत सातत्य्याने शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी विविध विषय घेवून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून शालेय स्तरावर उपक्रम राबवित आहे. पाच सहा वर्षापासून सुरू असलेले हे उपक्रम आता विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचे बनले आहेत. आज दूरदर्शन, संगणक, मोबाईल व इतर बाबींमुळे विद्यार्थी पुस्तक व वाचनापासून दूर जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानात भर व स्पर्धात्मक दृष्टीकोन निर्माण करणे हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. संस्काराचे मोती कौन बनेगा ॉम्पीयन स्पोर्टस बूक या सारख्या स्पर्धा घेऊन शालेय स्तरावर मुलांपर्यंत पोहोचण्याचे काम सर्वप्रथम लोकमतने केले. ही स्पर्धा अगोदर मर्यादित होती. मिळणारा प्रचंड प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा आता व्यापक झाली आहे. या स्पर्धेतून शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन मुलं वाचनाकडे वळू लागली आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनात कधीच उपलब्ध न होणाऱ्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलांना विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. हे केवळ लोकमतच्या माध्यमातून घडून येत आहे. परतूर शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची पूजा बालासाहेब ठाकर (इयत्ता ६ वी) या विद्यार्थिनीची विमान प्रवासासाठी निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील रायपूर ता. परतूर येथील रहिवासी ही मुलगी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिच्या जीवनात हा योग्य कधी आला असता की नाही, मात्र लोकमतच्या उपक्रमामुळे तिला ही सुवर्णसंधी लाभली हे मात्र खरे. (वार्ताहर)
लोकमत व लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने पूजाचा गौरव
लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आज पूजा ठाकर हिची जालना जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य कपिल आकात हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा रेस विभागप्रमुख किशोर मरकड, राजू अंभोरे, मुख्याध्यापक विठ्ठलराव काळुंके, उपमुख्याध्यापक एस.के. वायाळ, पर्यवेक्षक पी.बी. गुंजकर, ए.आर. बाहेती, लोकमतचे एजंट संतोष अग्रवाल हे होते. यावेळी पूजा ठाकरचा शाल, पुष्पहार देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सचिन खरात, संदीप वाघमारे, अमृत सवने, डी.बी. आकात, पी.बी. निर्वळ, मधुकर वखरे, बालाजी ढोबळे, नानासाहेब सरकटे आदी उपस्थित होते.
लोकमतमुळेच अशक्य
ते शक्य झाले-
पूजा ठाकर
हवाई सफारीसाठी निवड झालेली ला.ब.शा. विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा ठाकर या संदर्भात म्हणाली की, लोकमतमुळेच अशक्य ते शक्य झाले. मी जीवनात विमानात कधी बसले असते माहीत नाही, परंतु लोकमतमुळे मला अल्प वयात व शालेय जीवनातच ही संधी प्राप्त झाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. लोकमतने सुरू केलेले उपक्रम आज शालेय विद्यार्थ्यांसाठी अनमोल खजिना आहे. विशेषत: ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे. मुलांच्या जीवनात कधीच उपलब्ध न होणाऱ्या संधी आज लोकमतमुळे उपलब्ध होत आहेत. माझ्या आयुष्यात हा योग केवळ लोकमतमुळे घडून आला आहे. लोकमतकडून आयोजित विविध स्पर्धेंमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असेही ती म्हणाली.