गरिबांचे घराचे स्वप्न लवकरच साकार होणार..!
By Admin | Updated: April 15, 2017 00:33 IST2017-04-15T00:31:59+5:302017-04-15T00:33:41+5:30
जालना : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गरिबांचे घराचे स्वप्न लवकरच साकार होणार..!
जालना : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील सर्व्हे क्रमांक ४८८ येथे ३६४ सदनिका उभारण्यात येत असून येणाऱ्या काळात या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरिबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा विश्वास पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खोतकर बोलत होते. व्यासपीठावर पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, किशोर अग्रवाल, उद्योगपती घनश्याम गोयल, पंडित भुतेकर, वीरेंद्र धोका, अर्जुन गेही, विलास नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, दुर्बल घटकातील नागरिकांना २०२२ पर्यंत हक्काचे घर मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना चार प्रकारांत आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. (प्रतिनिधी)