अन् कविताचे स्वप्न राहिले अधुरे़़़!

By Admin | Updated: May 25, 2014 01:10 IST2014-05-25T00:51:40+5:302014-05-25T01:10:08+5:30

शिरुर : ती इतर चारचौघींसारखीच़़़ डी.एड. होऊन बाहेर पडली अन् तिला वेध लागले शिक्षिका होण्याचे़़़ आधी नोकरी अन् नंतर लग्न असा निर्धार जवळपास निश्चित झाला होता;

The dream of poetry remained incomplete! | अन् कविताचे स्वप्न राहिले अधुरे़़़!

अन् कविताचे स्वप्न राहिले अधुरे़़़!

शिरुर : ती इतर चारचौघींसारखीच़़़ डी.एड. होऊन बाहेर पडली अन् तिला वेध लागले शिक्षिका होण्याचे़़़ आधी नोकरी अन् नंतर लग्न असा निर्धार जवळपास निश्चित झाला होता; पण नियतीला हे मान्य नव्हते़ मॉर्निंग वॉकला गेलेली कविता पुन्हा परतलीच नाही़ त्यामुळे तिने पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले़ शिरुर येथील कविता बबन तळेकर ही २३ वर्षीय तरुणी शेजारी राहणार्‍या काशीबाई छत्रपती नन्नवरे यांच्यासमवेत शनिवारी पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेली़ रस्त्याच्या कडेला व्यायाम करता असताना एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्या दोघींनाही उडविले़ काशीबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर कविता हिला गंभीर इजा झाली़ अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तिला वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाटेतच तिने अखेरचा श्वास घेतला़ तिचे वडील बबनराव तळेकर यांचे गावात किराणा दुकान आहे़ बबनराव यांना तीन मुली व एक मुलगा़ त्यापैकी कविता ही धाकटी़ तिच्या दोन मोठ्या बहिणींचे विवाह झालेले आहेत़ कुटुंबियांनी फोडला टाहो! कविताने पाहिलेले स्वप्न साकार होण्याची वेळ समिप आली होती़ नोकरीचे प्रयत्न सुरु होते़ त्यानंतर तिच्यासाठी चांगले स्थळ शोध्ण्यात येणार होते़ मात्र, एका अपघाताने सारेच संपविले़ कुटुंबियांचा टाहो सुन्न करणारा होता़(वार्ताहर)

Web Title: The dream of poetry remained incomplete!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.