घरकुलाचे स्वप्न कागदावरच

By Admin | Updated: July 3, 2014 00:19 IST2014-07-02T23:34:28+5:302014-07-03T00:19:15+5:30

उस्मानाबाद : ग्रामीण भागात मातीच्या कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्यांना पक्के घर मिळावे, यासाठी शासनाने राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना सुरू केली.

The dream of the house is on the paper | घरकुलाचे स्वप्न कागदावरच

घरकुलाचे स्वप्न कागदावरच

उस्मानाबाद : ग्रामीण भागात मातीच्या कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्यांना पक्के घर मिळावे, यासाठी शासनाने राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना सुरू केली. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात बँक आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना पूर्णत: बारगळली असल्याचे दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेने राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविलेल्या ३ हजार ७५५ प्रस्तावांपैकी मे २०१४ अखेर केवळ ३४९ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, तब्बल २ हजार ९६५ प्रस्तावांत वेगवेगळ्या त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत.
राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना ही राज्य शासन पुरस्कृत असून, शासनाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार १७५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. या अनुषंगाने ४ हजार २९५ लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील ३ हजार ७५५ प्रस्ताव जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेकडून विविध बँकांकडे दाखल करण्यात आले होते. परंतु, संबंधित बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जवळपास एक वर्षांचा कालावधी झाला तरीही अद्याप केवळ ३४९ प्रकरणांनाना मंजुरी मिळू शकली. उर्वरित २ हजार ९६५ अर्जांमध्ये बँकांनी त्रुटी काढून परत केले असून, ४३० प्रकरणे बँकांकडे अद्याप प्रलंबित आहेत. उस्मानाबाद तालुक्यातून ९३३ प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकांकडे दाखल केली होती. परंतु, मेअखेर १७७ प्रकरणे मंजूर, ७४८ प्रस्तावांत त्रुटी तर १६ प्रकरणे प्रलंबित आहेत. अशीच परिस्थिती लोहारा तालुक्यात आहे. या तालुक्यातील २६१ प्रकरणे बँकेकडे सादर केली असता केवळ ३२ जणांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. उर्वरित १४ जणांचे प्रस्ताव बँकेकडे प्रलंबित आहेत. वाशी तालुक्यातूनही ४४६ परिपूर्ण प्रस्ताव बँकेकडे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आजवर ३७ प्रकरणांनाच बँकेकडून मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित ३९० प्रस्ताव त्रुटींत अडकले तर १४ प्रकरणे बँकेकडे धूळखात पडून असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले. ग्रामीण यंत्रणेकडून कळंब तालुक्यातील ६१९ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. आजपर्यंत केवळ यातील केवळ ४४ लाभार्थ्यांनाच घरकुलासाठी निधी मंजूर झाला आहे. उर्वरित २५ जण घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. भूम तालुक्यातील ३२८ प्रकरणे बँकांकडे सादर करण्यात आली होती. यातील २५ प्रकरणेच मंजूर झाली आहेत. तुळजापूर तालुक्यातही २६ प्रकरणे मंजूर आहेत. उमरगा तालुक्यात एकही घरकुल मंज़ूर झाले नाही. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय घरकुलाची स्थिती
तालुकाउदिष्टमंजूर प्रकरणेप्रलंबित प्रकरणे
उस्मानाबाद४८३ १७७१६
तुळजापूर३५०२६११
उमरगा३३५००००
लोहारा१९०३२१४
वाशी१६५३७१४
कळंब२८६४४२५
भूम१७२२५९२
परंडा१९४०८२५८

Web Title: The dream of the house is on the paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.