कुटुंबाचे स्वप्न ‘जीतो बार बार’ने स्वप्न केले पूर्ण

By Admin | Updated: August 4, 2015 00:23 IST2015-08-04T00:23:46+5:302015-08-04T00:23:46+5:30

औरंगाबाद : लोकमततर्फे २८ मार्च ते १२ मेदरम्यान घेण्यात आलेल्या ‘जीतो बार बार’ या लकी ड्रॉचे शुक्रवारी लोकमत भवन येथे मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

The dream of the family 'Zeta Bar Bar' has a dream fulfilled | कुटुंबाचे स्वप्न ‘जीतो बार बार’ने स्वप्न केले पूर्ण

कुटुंबाचे स्वप्न ‘जीतो बार बार’ने स्वप्न केले पूर्ण


औरंगाबाद : लोकमततर्फे २८ मार्च ते १२ मेदरम्यान घेण्यात आलेल्या ‘जीतो बार बार’ या लकी ड्रॉचे शुक्रवारी लोकमत भवन येथे मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. विजेत्यांनी या लकी ड्रॉतून मिळालेल्या बक्षिसाने स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.
वाचकांना काही इच्छा पूर्ण करता याव्यात म्हणून गेल्या दोन सत्रांपासून शहरातील नागरिकांसाठी लोकमत ‘जीतो बार बार’ ही लकी ड्रॉ योजना राबवीत आहे. शुक्रवारी दुसऱ्या सत्रातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण दूध डेअरीचे चेअरमन प्रल्हाद शिंदे, उद्योजक बबनराव पेरे पाटील, वाळूज चे प्रसिद्ध व्यापारी मनोज जयस्वाल यांच्या हस्ते बम्पर बक्षीस (वॅगन आर कार) विजेते रवींद्र विष्णू तरटे आणि त्यांच्या पत्नीकडे कारची चावी देण्यात आली. तसेच प्रथम बक्षीस विजेते उत्तमराव दळवी आणि लक्ष्मीबाई भंडारे यांना टीव्हीएस स्कूटी देण्यात आली. तसेच अन्य भाग्यवान विजेत्यांना इस्त्री, मिक्सर, इंडक्शन स्टोव्ह, स्मार्ट मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रीज, एलईडी टीव्ही इ. बक्षिसे वितरित करण्यात आली.
सूचना : प्रोत्साहनपर बक्षीस विजेत्यांनी आपले बक्षीस लोकमत भवन, रिगल लॉन्स येथून दि. ४, ५ व ६ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत घेऊन जावे. ं‘
जीतो बार बार’ या लोकमतच्या लकी ड्रॉमध्ये बम्पर बक्षीस लागल्याचे समजल्यानंतर खूप आनंद झाला. त्यामुळे माझे आणि कुटुंबियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
-रवींद्र तरटे, बम्पर बक्षीस विजेते

Web Title: The dream of the family 'Zeta Bar Bar' has a dream fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.