विमान प्रवासाचे स्वप्न ‘लोकमत’ने केले पूर्ण

By Admin | Updated: June 23, 2016 01:30 IST2016-06-23T00:51:53+5:302016-06-23T01:30:32+5:30

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न पाहणारे अनेक जण असतात. आकाशात उडणारे विमान अशा स्वप्नाळू

The dream of air travel has been done by 'Lokmat' | विमान प्रवासाचे स्वप्न ‘लोकमत’ने केले पूर्ण

विमान प्रवासाचे स्वप्न ‘लोकमत’ने केले पूर्ण


औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न पाहणारे अनेक जण असतात. आकाशात उडणारे विमान अशा स्वप्नाळू व्यक्तींच्या मनाला प्रत्येक वेळी नवी उभारी देऊन जाते. असेच विमान प्रवासाचे स्वप्न पाहत होता तेजस अशोक वाघ हा विद्यार्थी. त्याचे विमान प्रवासाचे स्वप्न आश्चर्यकारक रीतीने पूर्ण झाले आणि तेही ‘लोक मत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेमुळे.
या स्पर्धेच्या सोडतीचा (लकी ड्रॉ) निकाल नुकताच लागला असून यामध्ये गोदावरी पब्लिक स्कूल येथे इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी तेजस वाघ हा हवाई सफरीच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तो लवकरच मुंबई- दिल्ली- मुंबई असा विमानप्रवास करणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने शाळेत जाऊन या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला आणि त्याला प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ‘लोकमत’च्या वितरण विभागाचे व्यवस्थापक प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव, प्रतिनिधी प्रशांत आरक, गंगाधर पठाडे, प्राचार्या शुभांगी काळे, उपमुख्याध्यापक दिलीप सूर्यवंशी, पर्यवेक्षिका वैशाली सोनवणे, बबन माळी आदींच्या हस्ते तेजसचा सत्कार करण्यात आला. तेजसचे आई-वडील नंदा व अशोक वाघ यांची उपस्थिती होती. शिक्षक संतोष गोसावी, विजय रानभरे, देविदास कोकदे यांनी तेजसला शुभेच्छा दिल्या.
‘लोकमत’ने सुरू केलेली संस्काराचे मोती ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून घराघरांमध्ये तसेच शाळा-शाळांमध्ये संस्काराचे बीजारोपण करण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘लोकमत’ करत आहे, असे मत प्राचार्या शुभांगी काळे यांनी व्यक्त केले.
आई-वडील अत्यानंदाने भावनाविवश...
आपल्या मुलाचे विमान प्रवासाचे स्वप्न पुर्ण होत असल्याचे बघून तेजसचे आई-वडील अत्यानंदाने अत्यंत भावूक झाले होते. त्याची आई म्हणाली की, माझ्या मुलाचे हे स्वप्न फ क्त आणि फक्त ‘लोकमत’मुळेच पूर्ण होत आहे. त्यांनी ‘लोकमत’चे मनापासून आभार मानले आणि या उपक्रमाचे कौतुक केले.
मी दुसरीत असल्यापासून या स्पर्धेत नियमितपणे भाग घेत होते. यंदा मी ही स्पर्धा जिंकेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. माझे हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. विमान प्रवासासाठी शुभेच्छा देऊन ‘लोकमत’ने माझा गौरव केला. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. - तेजस वाघ, ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचा विजेता

Web Title: The dream of air travel has been done by 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.