कमळापूरच्या हनुमाननगरात ड्रेनेजलाईनचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:08 IST2019-07-30T23:08:45+5:302019-07-30T23:08:53+5:30
कमळापूरातील हनुमाननगरात ग्रामपंचायतीच्या वतीने ड्रेनेजलाईनचे काम सुरु करण्यात आले आहे.

कमळापूरच्या हनुमाननगरात ड्रेनेजलाईनचे काम सुरु
वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कमळापूरातील हनुमाननगरात ग्रामपंचायतीच्या वतीने ड्रेनेजलाईनचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी ग्रामनिधीतून ६ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
हनुमाननगर या कामगार वसाहतीत ड्रेनेजलाईन नसल्यामुळे नागरिकांनी घरासमोर सेफ्टी टँक बसविले होते. मात्र, सेफ्टी टँक सतत चोकप होत असल्यामुळे ड्रेनेजचे पाणी वसाहतीतून वाहत होते. येथील ड्रेनेजलाईनचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या.
या वसाहतीतील सांडपाणी व ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी सरपंच सोनू लोहकरे, उपसरपंच मंगलबाई निळ, सदस्य सूर्यभान काजळे, प्रविण दुबिले, पंडीत पनाड, कलीम शहा, योगेश दळवी,नजीरखॉ पठाण, कल्याण साबळे, सुनिल वाघमारे, वनिता नरवडे, करुणा सोनकांबळे, लक्ष्मीबाई चव्हाण,छाया बोंबले, लक्ष्मीबाई कर्डिले, अनिता सरवदे, सुमनबाई काजळे आदींनी पुढाकार घेत ग्रामनिधीतून ड्रेनेजलाईनचे काम करण्याचा निर्णय घेतला होता.