दत्त कॉलनीत ड्रेनेजलाइन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:04 IST2021-03-04T04:04:41+5:302021-03-04T04:04:41+5:30

----------------------- कमळापुरातून दुचाकी लांबविली वाळूज महानगर : कमळापुरात राहत्या घरासमोरून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Drainage line ruptured in Dutt Colony | दत्त कॉलनीत ड्रेनेजलाइन फुटली

दत्त कॉलनीत ड्रेनेजलाइन फुटली

-----------------------

कमळापुरातून दुचाकी लांबविली

वाळूज महानगर : कमळापुरात राहत्या घरासमोरून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अय्यास अब्बास शेख (रा. कमळापूर) यांनी १० फेब्रुवारीला रात्री दुचाकी (एम.एच.२०, एफ.एल.३४४०) घरासमोर उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली आहे.

---------------------------------

मीनाक्षी जाधव यांना पुरस्कार

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी भानुदास जाधव यांना भारतीय समाजोन्नती संघातर्फे जयभारत राष्ट्रीय चेतना पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक आ.नरेंद्र दराडे व मान्यवरांच्या उपस्थितीत मीनाक्षी जाधव यांना सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो - मीनाक्षी जाधव

----------------------

एकतानगर-जोगेश्वरी रस्त्याची दयनीय अवस्था

वाळूज महानगर : रांजणगावातील एकतानगर ते जोगेश्वरीकडे जाणाऱ्या जवळपास अर्धा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, खडी निखळून पडली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याने, वाहनधारकात असंतोषाचे वातावरण आहे.

-------------------------

विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघाविरुद्ध गुन्हा

वाळूज महानगर : जोगेश्वरीतील एका ३० वर्षीय विवाहितेचा ५ लाखांसाठी छळ करणाऱ्या सासरच्या तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी रमेश पडूळ या विवाहितेस दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला होता. सततच्या छळाला कंटाळून लक्ष्मी पडूळ हिने पती रमेश पडूळ, सासू राधाबाई पडुळ व दीर सुनील पडूळ यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

---------------------

Web Title: Drainage line ruptured in Dutt Colony